यामुळं धोनीनं कपिलच्या शोमध्ये जाण्यास दिला नकार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 11:42 IST2016-10-03T06:12:37+5:302016-10-03T11:42:37+5:30
कोणताही नवा सिनेमा आला की त्याचं प्रमोशन करण्यासाठी त्या सिनेमाची टीम हमखास 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावते. मात्र ...

यामुळं धोनीनं कपिलच्या शोमध्ये जाण्यास दिला नकार ?
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">कोणताही नवा सिनेमा आला की त्याचं प्रमोशन करण्यासाठी त्या सिनेमाची टीम हमखास 'द कपिल शर्मा शो'मध्ये हजेरी लावते. मात्र टीम इंडियाचा वनडे टीमचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी याला अपवाद ठरलाय. त्याच्या जीवनावरील एम.एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या सिनेमाच्या प्रमोशनसाठी धोनी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावणार नाही. गेल्या काही दिवसांपासून धोनीनं आपल्या शोमध्ये येऊन सिनेमाचं प्रमोशन करावं यासाठी कपिल शर्मा प्रयत्न करतोय. तनिष्ठा चटर्जीसोबत एका शोमध्ये घडलेल्या प्रकरणामुळे सध्या कॉमेडी शोमध्ये सहभागी होण्यासंदर्भात अनेक कलाकार सावध पवित्रा घेतायत. त्यामुळं धोनीसुद्धा याच कारणामुळे कपिलच्या शोमध्ये जाणार नसल्याचं समजतंय. त्यामुळं धोनीला त्याच्या शोमध्ये आणण्याची कपिलची इच्छा अपूर्ण राहणार असल्याचं समजतंय.