लॉकडाऊनमध्ये चक्क राणादाच्या वहिनीने लावला चक्क पाणीपुरीचा स्टॉल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 17:33 IST2020-04-20T17:26:37+5:302020-04-20T17:33:41+5:30
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये चक्क राणादाच्या वहिनीने लावला चक्क पाणीपुरीचा स्टॉल!
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असलेल्या, या कठीण काळात संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी, काही कठोर नियमांचे पालन आपल्याला करावे लागत आहे. सेलिब्रिटी मंडळीदेखील याला अपवाद नाहीत. अभिनेत्री धनश्री काडगावकर सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात आहे.
धनश्री, सध्या किचनमध्ये रमलेली आहे. तिची स्वयंपाकाची हौस ती भागवून घेत असल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर स्वयंपाक करतानाचे फोटो आणि व्हिडीओ धनश्री टाकत असतो. चाहत्यांसाठी तिने एक नवा विडिओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात तिचे पाणीपुरी प्रेम पाहायला मिळत आहे. घरी बनवलेल्या पाणीपुरीचा तिने स्वतः तर आस्वाद घेतलाच; पण, घरातील इतर मंडळींसाठी, तिने घरातच पाणीपुरीचा स्टॉल लावला आहे.
'अभी कुछ दिनों से लगता हैं, बदले बदले से हम हैं। क्यू कीं हम आजकल किचन में ज्यादा वक्त गुजारते हैं। हैं दिल पें शक मेरा, इसें प्यार हो गया खाना पकाने सें।' असं कॅपशन टाकून तिने हा विडिओ सोशल मीडियावर टाकलेला आहे. अभिनय आणि नृत्याबरोबरच, तिचे हे सुप्त गुण सगळ्यांसमोर आले आहेत.
'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मुळे धनश्रीला 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती 'गंध फुलांचा गेला सांगून', 'जन्मगाठ' या मालिकांमध्ये झळकली.