आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब हरल्यानंतर धनश्री वर्माची पोस्ट, कोहलीचा फोटो शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:02 IST2025-06-04T12:01:58+5:302025-06-04T12:02:27+5:30
युजवेंद्र चहलच्या ex पत्नीची पोस्ट व्हायरल

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाब हरल्यानंतर धनश्री वर्माची पोस्ट, कोहलीचा फोटो शेअर करत म्हणाली...
आयपीएल २०२५ (IPL 2025) चा काल अंतिम सामना झाला. पंजाब किंग्स (PBKS) विरुद्ध बंगळुरुमध्ये (RCB) झालेल्या या रोमांचकारी सामन्यात बंगळुरुने विजय मिळवला. हा विजय संघासाठी कास होता कारण १८ वर्षात पहिल्यांदाच त्यांनी ट्रॉफीवर नाव कोरलं. तसंच किंग कोहलीसाठी हा सीझन स्पेशल असणार होता. आयपीएलचा १८ वा सीझन, त्याची १८ नंबरची जर्सी आणि संघाचा फॉर्म यामुळे यंदा बंगळुरु आयपीएल जिंकेल असाच अनेकांचा अंदाज होता. या विजयानंतर आरसीबी चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यानिमित्त धनश्री वर्माने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
युजवेंद्र चहलची EX पत्नी धनश्री वर्माने आरसीबीच्या विजयानंतर सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली. तिने विराट कोहलीचा हातात ट्रॉफी घेतलेला फोटो शेअर करत लिहिले, "फायनली...१८ साठी नंबर १८... अभिनंदन विराट कोहली आणि टीम".
विशेष म्हणजे बंगळुरु विरुद्ध पंजाब असा हा सामना होता जिथे पंजाब संघात युजवेंद्र चहल होता. चहलने फायनलमध्ये चांगली बॉलिंग केली मात्र निकाल त्यांच्याबाजूने लागला नाही. तर दुसरीकडे युजवेंद्र याआधी बंगळुरु संघाकडूनही खेळला आहे. २०१४ ते २१ असा मोठा काळ तो आरसीबीत होता.
आरसीबीने १८ वर्षात पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. पंजाब संघानेही आतापर्यंत ट्रॉफी जिंकलेली नाही तसंच हा संघ पहिल्यांदाच फायनलपर्यंत पोहोचला होता. यासाठी सर्वांनी कर्णधार श्रेयस अय्यरला याचं श्रेय दिलं.