'ठरलं तर मग'फेम अभिनेत्रीसाठी यंदाची दिवाळी ठरली खास; खरेदी केली मर्सिडीज कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 03:12 PM2023-11-13T15:12:52+5:302023-11-13T15:13:28+5:30

Prajakta kulkarni: प्राजक्ताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे.

dhadakebaaz movie actress-prajakta kulkarni buy-new-car | 'ठरलं तर मग'फेम अभिनेत्रीसाठी यंदाची दिवाळी ठरली खास; खरेदी केली मर्सिडीज कार

'ठरलं तर मग'फेम अभिनेत्रीसाठी यंदाची दिवाळी ठरली खास; खरेदी केली मर्सिडीज कार

मराठी कलाविश्वात सुपरहिट ठरलेला सिनेमा म्हणजे 'धडाकेबाज'. ९० च्या काळात हा सिनेमा प्रचंड गाजला. लक्ष्मीकांत बेर्डे (laxmikant berde), महेश कोठारे (mahesh kothare), दीपक शर्के (deepak shirke), अश्विनी भावे (ashvini bhave)  आणि प्राजक्ता कुलकर्णी (prajakta kulkarni)  ही कलाकार मंडळी सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती. यापैकीच अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी हिचा आज सिनेमांसह छोट्या पडद्यावरही तितकाच सक्रीय वावर आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्राजक्ताने नुकतीच चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. तिच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

प्राजक्ता सध्या ठरलं तर मग या गाजलेल्या मालिकेत काम करत आहे. त्यामुळे दररोज ती प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. विशेष म्हणजे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असलेल्या प्राजक्ताने नुकतीच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मर्सिडीज कार खरेदी केली आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

प्राजक्ताने मर्सिडीज बेंझ equa ही नवीकोरी कार खरेदी केली आहे. या कारची बेसिक किंमत ६२ लाखांपासून सुरु होते. प्राजक्ताने ही कार खरेदी केल्यानंतर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. इतकंच नाही तर अभिनेत्री सुकन्या मोने- कुलकर्णी यांनी तर थेट लॉग ड्राइव्हला जाण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, प्राजक्ता कुलकर्णी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. नाटक, मालिका आणि सिनेमा असा त्यांचा कलाविश्वातील प्रवास आहे. सध्या त्या ठरलं तर मग या मालिकेत त्या अर्जुनच्या आईची भूमिका साकारत आहेत.
 

Web Title: dhadakebaaz movie actress-prajakta kulkarni buy-new-car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.