खुशबू तावडेने शेअर केली बाळाची पहिली झलक; पाहा अभिनेत्रीचा गोड फॅमिली फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 12:58 IST2022-03-06T12:57:25+5:302022-03-06T12:58:04+5:30

Kushboo tawde: कोणालाही प्रेमात पाडेल इतंक गोड दिसतं खुशबू-संग्रामचं बाळ

devyani fame marathi actress kushboo tawde share her babays first photo | खुशबू तावडेने शेअर केली बाळाची पहिली झलक; पाहा अभिनेत्रीचा गोड फॅमिली फोटो

खुशबू तावडेने शेअर केली बाळाची पहिली झलक; पाहा अभिनेत्रीचा गोड फॅमिली फोटो

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे खुशबू तावडे (khushboo tawde). काही दिवसांपूर्वीच खुशबूने तिच्या डोहाळ जेवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ती आई होणार असल्याची गुड न्यूज दिली होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच तिने आणखी एक फोटो शेअर करत तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं. तेव्हापासून खुशबूच्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी नेटकरी आतुर झाले होते. यामध्येच आता खुशबूने तिच्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे. 

काही दिवसांपूर्वी खुशबूने बाळाचा पाठमोरा फोटो शेअर केला होता. त्यानंतर आता तिने तिच्या बाळाची पहिली झलक दाखवली आहे. त्यामुळे चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत तिच्या बाळावर अनेकांनी प्रेम, आशीर्वाद यांचा वर्षाव केला आहे.

 खुशबूने तिच्या फॅमिलीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती, तिचा नवरा अभिनेता संग्राम साळवी (sangram salvi) आणि त्यांचं चिमुकलं बाळ दिसून येत आहे. खुशबूने २ नोव्हेंबर २०२१ मध्ये एका चिमुकल्या मुलाला जन्म दिला. त्यामुळे बाळाला चार महिने पूर्ण झाल्यामुळे तिने हा गोड फॅमिली फोटो शेअर केला.

दरम्यान, खुशबूने तिच्या बाळाचं नाव राघव ठेवलं आहे. खुशबू आणि संग्राम मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी 'देवयानी' या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या निमित्ताने त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर. २०१८ साली या दोघांनी लग्न केलं. खुशबू 'एक मोहोर अबोल', 'देवयानी', 'पारिजात', 'धर्मकन्या', 'मेरे साई', 'तेरे बिन', 'आम्ही दोघी', अशा काही  हिंदी मराठी मालिकेत झळकली आहे.
 

Web Title: devyani fame marathi actress kushboo tawde share her babays first photo