देवयानी फेम दीपाली पानसरे झळकणार खिडकीमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 16:20 IST2016-07-02T10:50:28+5:302016-07-02T16:20:28+5:30
देवयानीमध्ये प्रमुख भूमिकेत दिसलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री दीपाली पानसरे आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खºया आयुष्यातील विनोदी किस्से घेऊन ...

देवयानी फेम दीपाली पानसरे झळकणार खिडकीमध्ये
ेवयानीमध्ये प्रमुख भूमिकेत दिसलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री दीपाली पानसरे आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खºया आयुष्यातील विनोदी किस्से घेऊन खिडकी ही मालिका सर्वांना खदखदून हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. दीपाली देखील या विनोदी मालिकेचा एक भाग असून ४ जुलैला प्रसारित होणाºया खिडकीमधील गोविंदा गोविंदा या कथानकावर आधारित भागांमध्ये ती प्रेक्षकांसमोर शांती नावाच्या दाक्षिणात्य मुलीच्या पात्रात दिसून येणार आहे. आपण कुटुंबियांना बहुतेकदा गृहीत धरतो आणि स्वार्थी वागतो पण तसे न करता फॅमिली बॉण्डिंगवर भर देणारा खिडकी मधील हा एपिसोड एका दाक्षिणात्य कुटुंबावर चित्रित केलेला आहे आणि दीपाली त्या कुटुंबातील एका सदस्याचा पात्र साकारणार आहे. दीपालीच्या पात्राचे नाव शांती असले तरीही ते पात्र सर्वात अशांत असणार आहे. हा एपिसोड बघून प्रेक्षकांना हसता हसता कौटुंबिक नात्यांचे महत्व कळून येईल. देवयानी सोबतच दीपालीने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे आणि तसंच प्रेक्षकांनी तिला अनेक जाहिरातींमधून देखील पाहिले आहे, पण आता दीपालीचे खिडकी मधील हे नवीन दाक्षिणात्य पात्र देखील सर्वांच्या तितक्याच पसंतीस पडेल यात शंका नाही.