‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्रीच्या कुकला झाला कोरोना, बिल्डींग सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 12:43 IST2020-05-07T12:43:06+5:302020-05-07T12:43:13+5:30

अभिनेत्री14 दिवसांसाठी क्वारंटाइन

devoleena bhattacharjee cook test positive for coronavirus actress quarantine for 14 days building seal-ram | ‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्रीच्या कुकला झाला कोरोना, बिल्डींग सील

‘बिग बॉस 13’ फेम अभिनेत्रीच्या कुकला झाला कोरोना, बिल्डींग सील

ठळक मुद्देदेवोलिना काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 13’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

भारतात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार वाढतोय. कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 हजारांपार गेला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांचा ग्राफ धक्कादायकरित्या वाढत असताना आता कोरोना व्हायरसमुळे आणखी एका टीव्ही अभिनेत्रीची बिल्डींग सील करण्यात आली आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे देवोलिना भट्टाचार्जी.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, देवालिनाच्या बिल्डींगमधील एक कुक कोरोना पॉझिटीव्ह आढळला. यानंतर संपूर्ण बिल्डींग सील करण्यात आली. देवोलिनाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हा कुक देवोलिनाच्या घरीही काम करत होता. कुक कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर देवोलिनाने स्वत:ला 14 दिवसांसाठी क्वारंटाइन केले आहे.

देवोलिना तिची आई व भावासोबत मुंबईच्या गोरेगाव इस्ट भागात राहते. सध्या तिचे कुटुंब लॉकडाऊनमुळे आसामात अडकून पडलेय.
देवोलिनाआधी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम पिंकू अर्थात अजहर शेखची बिल्डींग सील करण्यात आली होती. अजहरच्या बिल्डींगमध्ये एक 45 वर्षांची व्यक्ति कोरोना पॉझिटीव्ह आढळली होती. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, राजकुमार राव तसेच टीव्ही अभिनेता शिवीन नारंग यांच्या बिल्डींगमध्येही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्यानंतर त्यांची सोसायटीही काही काळ सील केली गेली होती.

देवोलिना काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस 13’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. अर्थात दुखापतीमुळे तिला हा शो मध्येच सोडावा लागला होता. स्टार प्लसवरील ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेत गोपी बहूची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली होती. टीव्हीवर ती साधी सोज्वळ दिसत असली तरी ख-या आयुष्यात प्रचंड बोल्ड आहे.

Read in English

Web Title: devoleena bhattacharjee cook test positive for coronavirus actress quarantine for 14 days building seal-ram