Holi 2023 :लग्नानंतर गोपी बहूने साजरी केली पहिली होळी, पतीसोबत झाली रोमाँटिक; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:21 AM2023-03-07T11:21:02+5:302023-03-07T11:33:03+5:30

छोट्या पडद्यावरील गोपी बहू उर्फ देवोलिना भट्टाचार्जीने पतीसोबत लग्नानंतरची पहिली होळी साजरी केली आहे.

Devoleena bhattacharjee celebrated her first holi 2023 with husband shahnawaz sheikh | Holi 2023 :लग्नानंतर गोपी बहूने साजरी केली पहिली होळी, पतीसोबत झाली रोमाँटिक; व्हिडीओ व्हायरल

Holi 2023 :लग्नानंतर गोपी बहूने साजरी केली पहिली होळी, पतीसोबत झाली रोमाँटिक; व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

Holi 2023 : भारतात होळीचा सण जल्लोषात साजरा केला जातो. रंगांचा हा सण बॉलिवूड ते टीव्ही इंडस्ट्रीमध्येही मोठ्या थाटामाटात साजरा होतो. सेलिब्रेटीही यात मागे कसे राहतील. टीव्हीवरील छोटी बहू उर्फ अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee)ही होळी साजरी करताना दिसली. यंदाची होळी तिच्यासाठी खूप खास आहे, कारण ती लग्नानंतर पहिल्यांदाच ती साजरी करत आहे.

देवोलिना भट्टाचार्जीने होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो तिच्या प्री-होली फोटोशूटचा आहे. व्हिडिओमध्ये ती आणि तिचा पती शाहनवाज शेख(Shahnawaz Sheikh) रंगात रंगून गेलेत. देवोलिना पतीसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. यादरम्यान अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता, तर  शाहनवाजने पांढरा शर्ट आणि डेनिम पॅन्टमध्ये दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करत 'साथ निभाना साथिया' (साथ निभाना साथिया) उर्फ ​​देवोलीनाच्या 'गोपी बहू'ने चाहत्यांना खुलासा केला की ती तिच्या पतीसोबत प्री-वेडिंग फोटोशूट करू शकली नाही, पण आता मी सगळ्या सणाचा आनंद घेणार आहे. 

देवोलिना भट्टाचार्जीने 14 डिसेंबर 2022 रोजी जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत कोर्ट मॅरेज केले होते. तिने अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. लग्नापूर्वी देवोलीनाने शाहनवाजला जवळपास ३ वर्षे डेट केले होते. लग्नानंतर अभिनेत्री प्रत्येक सण एका खास पद्धतीने साजरा करत असते.

देवोलिना ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जिला 'साथ निभाना साथिया' मधून ओळख मिळाली. ती 'बिग बॉस 13' आणि 'बिग बॉस 14' मध्येही दिसली आहे.

Web Title: Devoleena bhattacharjee celebrated her first holi 2023 with husband shahnawaz sheikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.