डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस ३' येणार?; बज्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 12:31 IST2022-12-21T12:22:15+5:302022-12-21T12:31:45+5:30

देवमाणूस मालिकेची प्रेक्षकांमधील क्रेझ अद्याप संपली नाही. दरम्यान आता देवमाणूस मालिकेचे तिसरे पर्व लवकरच येणार अशी चर्चा सुरू आहे.

Devmanus serial 3 season is coming?; actor kiran dange share group photo | डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस ३' येणार?; बज्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे रंगलीय चर्चा

डॉक्टरचा खेळ पुन्हा सुरू होणार? 'देवमाणूस ३' येणार?; बज्यानं शेअर केलेल्या फोटोमुळे रंगलीय चर्चा

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'देवमाणूस' (Devmanus)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या पर्वाला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र अद्याप या मालिकेची प्रेक्षकांमधील क्रेझ संपली नाही. दरम्यान आता देवमाणूस मालिकेचे तिसरे पर्व लवकरच येणार अशी चर्चा सुरू आहे. 

गावात सुंदर महिला दिसली की तिच्यासमोर गोड गोड बोलून तिला जाळ्यात ओढायचे आणि खोट्या प्रेमात फसवायचे. तिला लग्नाचे आमिष दाखवायचे. तिचे दागिने, जमीन, पैसा लुटायचा आणि शेवटी तिचा खून करायचा. देवमाणूस बनून मुखवटा घालून फिरणारा अजित कुमार देव प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. देवमाणूस या मालिकेने पहिल्या भागात तर टीआरपीचे सगळे रेकॉर्ड तोडले होते. दुसरा भागही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला.  मालिकेच्या तिसऱ्या पर्वाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्यातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय, त्यामुळं देवमाणूस ३ येणार की काय? असे प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत.

देवमाणूस मालिकेतील बज्या म्हणजेच किरण डांगेनं सोशल मीडियावर एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्यासोबत बाबू काका, विजय भाऊ (एकनाथ गिते) आणि नाम्या (निलेश गवारे) दिसतायेत. हा फोटो पाहून देवमाणूसच्या तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला तर सुरुवात झाली नाही ना?, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. जर देवमाणूस मालिकेचा तिसरा भाग आला तर फाशी दिलेला डॉ अजितकुमार उर्फ नटवर कसा परत येणार हा प्रश्न मात्र प्रेक्षकांच्या मनात डोकावत आहे. 

Web Title: Devmanus serial 3 season is coming?; actor kiran dange share group photo