'देवमाणूस' तोच आहे, किरण गायकवाड घेऊन येतोय तिसरा सीझन लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 12:35 IST2025-04-22T12:34:55+5:302025-04-22T12:35:22+5:30

Devmanus Serial : झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेच्या दोन भागांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर आता या मालिकेचा तिसरा सीझन भेटीला येतो आहे.

'Devmanus' is the same, Kiran Gaikwad is bringing the third season soon | 'देवमाणूस' तोच आहे, किरण गायकवाड घेऊन येतोय तिसरा सीझन लवकरच

'देवमाणूस' तोच आहे, किरण गायकवाड घेऊन येतोय तिसरा सीझन लवकरच

झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे देवमाणूस. या मालिकेच्या दोन भागांनी रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर आता या मालिकेचा तिसरा सीझन भेटीला येतो आहे. या सीझनचे प्रोमो समोर आल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या तिसऱ्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार?  यात कोण कोण कलाकार असणार ? याची सगळीकडे चर्चा  सुरू झाली. देवमाणूसच्या तिसऱ्या सीझनमध्ये परत एकदा आपल्याला देवमाणसाच्या मुख्य भूमिकेत अभिनेता किरण गायकवाड दिसणार आहे.  त्याच्यासोबत अस्सल गावरान भाषेने प्रेक्षकांचे मन जिंकलेली सरू आज्जी म्हणजे रुक्मिणी सुतार सुद्धा दिसणार आहेत. तसेच या मालिकेत पहिल्या दोन सीझनप्रमाणेच गावातली अनेक नवीन इरसाल पात्रदेखील पाहायला मिळणार आहेत. 

देवमाणूस - मधला अध्याय, या मालिकेची कथा, पहिल्या आणि दुसऱ्या सीजनच्या मधली आहे.  डॉक्टर आजीतकुमार देव कातळवाडीतून निघून गेल्यानंतर आणि तो परत येऊन त्याला फाशी झाली, या मधल्या काळात तो कुठे होता? काय करत होता? तिथेही तो कसा पोहचला, त्याने कुणाला फसवलं, माणसांच्या विश्वासाचा कसा गैरफायदा घेतला. हे सगळं आपल्याला देवमाणूस मधला अध्याय या मालिकेत बघायला मिळणार आहे. 


आधीच्या दोन्ही सीजनप्रमाणे या मालिकेचही लेखन स्वप्नील गांगुर्डे आणि विशाल कदम हीच जोडगोळी करणार आहे. स्वप्नील गांगुर्डे पटकथा तर विशाल कदम संवाद लेखन करणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक  राजू सावंत करत आहेत. त्यांनीच आधीच्याही दोन्ही सीझनचे दिग्दर्शन केलंय. वज्र प्रोडक्शनच्या श्वेता शिंदे आणि संजय खांबे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून, लवकरच तुम्हाला झी मराठीवर ही मालिका पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Devmanus' is the same, Kiran Gaikwad is bringing the third season soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.