'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 15:33 IST2024-02-01T15:32:49+5:302024-02-01T15:33:20+5:30

"ए फेब्रुवारी आहे...", किरण गायकवाड कोणाला करतोय डेट? पोस्टने वेधलं लक्ष

devmanus fame marathi actor kiran gaikwad express his love post goes viral | 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे ती?

'देवमाणूस' फेम किरण गायकवाडने दिली प्रेमाची कबुली! कोण आहे ती?

व्हॅलेंटाइन डे आणि प्रेमीयुगुलांसाठी फेब्रुवारी महिना ओळखला जातो. या महिन्यात जिकडेतिकडे प्रेमाचे वारे वाहताना दिसतात. अनेक जण त्यांच्या मनातील भावना प्रेम असणाऱ्या व्यक्तीजवळ व्यक्त करतात. फेब्रुवारी महिन्याचा मुहुर्त गाठत मराठमोळ्या अभिनेत्यानेही प्रेमाची कबुली दिली आहे. 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाडने त्याच्या सोशल मीडियावरुन अभिनेत्रीचा फोटो शेअर केला आहे. 

किरण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबतही तो अनेक पोस्ट शेअर करताना दिसतो. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. किरणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये गुलाबांचा गुच्छ आणि एक मुलगी दिसत आहे. पण फोनने त्या मुलीने चेहरा लपवल्याचं दिसत आहे. हा फोटो शेअर करत किरणने "ए फेब्रुवारी आहे...आतातरी फायनली आपण सगळ्यांना सांगूयात का", असं कॅप्शन दिलं आहे. त्याची ही पोस्ट पाहून चाहतेही संभ्रमात पडले आहेत. 

किरणच्या फोटोतील ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अस्मिता देशमुख आहे. 'देवमाणूस' मालिकेत अस्मिता आणि किरणने एकत्र काम केलं होतं. या मालिकेत डिंपल ही भूमिका साकरून अस्मिताने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. किरणच्या या पोस्टमुळे अस्मिता आणि त्याच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

मराठमोळा अभिनेता किरण गायकवाड 'लागिर झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचला. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 'लागिर झालं जी'मधील त्याच्या भूमिकेचं प्रचंड कौतुकही झालं होतं. तर 'देवमाणूस' मध्ये मुख्य भूमिका साकारुन त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'चौक' सिनेमात तो झळकला होता. 

Web Title: devmanus fame marathi actor kiran gaikwad express his love post goes viral