अखेर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचंही ठरलं तर मग! वैष्णवीसोबत व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीख केली जाहीर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 12:19 IST2024-12-07T12:19:03+5:302024-12-07T12:19:54+5:30

Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar : काही दिवसांपूर्वी देवमाणूस फेम किरण गायकवाडनेदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमात असल्याची कबुली दिली होती. आता अभिनेत्याने रिल शेअर करत लग्नाची तारीख जाहीर केली असल्याचे बोलले जात आहे.

'Devmanus' fame Kiran Gaikwad And Vaishanavi Kalyankar wedding date goes out, Announcing the date of marriage by sharing a video | अखेर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचंही ठरलं तर मग! वैष्णवीसोबत व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीख केली जाहीर?

अखेर 'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचंही ठरलं तर मग! वैष्णवीसोबत व्हिडीओ शेअर करत लग्नाची तारीख केली जाहीर?

सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लगीनघाई पाहायला मिळत आहे. नुकतेच रेश्मा शिंदे (Reshma Shinde) हिने तिचा बॉयफ्रेंड पवनसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता शाल्व किंजवडेकर-श्रेया डफळापुरकर, कौमुदी वलोकर-आकाश चौकसे हे जोडपेदेखील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दरम्यान आता काही दिवसांपूर्वी देवमाणूस फेम किरण गायकवाड(Kiran Gaikwad)नेदेखील सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेमात असल्याची कबुली दिली. तो वैष्णवी कल्याणकर(Vaishnavi Kalyankar)ला डेट करत आहे. त्यानंतर आता अभिनेत्याने रिल शेअर केला आहे, जो पाहून नेटकरी लग्नाची तारीख जाहीर केली असल्याचे बोलत आहेत.

अभिनेता किरण गायकवाडने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबतचा रिल शेअर केला आहे आणि त्यात शेवटी १४ डिसेंबर ही तारीख सेव्ह करा असे म्हटले आहे. ही तारीख पाहिल्यानंतर ते दोघे या तारखेला लग्न करणार आहेत, असे नेटकरी म्हणत आहेत. ते दोघे १४ डिसेंबरला लग्न करत आहेत की साखरपुडा हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.


पोस्ट शेअर करत प्रेमाची दिली कबुली
किरण गायकवाडने वैष्णवीसोबतचे फोटो शेअर करुन सोशल मीडियावर लिहिले की,"तू काही संगीतकार नाहीस आणि गायक पण नाहीस; पण तरीही मी संपूर्ण आयुष्य तुझ्या चालीवर चालायच ठरवलं आहे. मंत्रिमंडळतल्या बैठका होत राहतील, मंत्री पद वाटत राहतील, त्यांचं ठरतंय तोपर्यंत आपलं ठरलेलं सगळ्यांना सांगून टाकतो… ही आहे माझी होणारी 'होम मिनिस्टर'!" याशिवाय #SheSaidYes #ForeverYours #NewBeginnings असे हॅशटॅग वापरुन किरणने प्रेमाची कबुली दिली. 

वर्कफ्रंट
किरण गायकवाडने 'लागिर झालं जी', 'देवमाणूस' या मालिकांबरोबरच अनेक मालिकांमध्ये काम केले. मराठी सिनेमांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'चौक', 'फकाट', 'बघतोस काय मुजरा कर' आणि  'डंका हरिनामाचा' या सिनेमांमध्ये तो झळकला आहे. तर वैष्णवी कल्याणकर सुद्धा अभिनेत्री असून तिने 'तू चाल पुढं', 'देवमाणूस २' या मालिकांमध्ये काम केलंय. सध्या ती 'तिकळी' मालिकेत अभिनय करतेय.

Web Title: 'Devmanus' fame Kiran Gaikwad And Vaishanavi Kalyankar wedding date goes out, Announcing the date of marriage by sharing a video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.