देव बनला देवदास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 15:08 IST2016-09-09T09:38:48+5:302016-09-09T15:08:48+5:30
कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत सध्या देव आणि सोनाक्षीमध्ये दुरावा आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सोनाक्षी ...
.jpg)
देव बनला देवदास
क छ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत सध्या देव आणि सोनाक्षीमध्ये दुरावा आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सोनाक्षी रितविकसोबत लग्न करण्यास तयार झाली असल्याने देव आता दारूच्या आहारी गेलेला आहे. देवची भूमिका साकारणारा शहीर शेख त्याच्या खऱ्या आयुष्यात दारुला स्पर्शदेखील करत नाही. त्यामुळे या दृश्यांचे चित्रीकरण करणे हे त्याच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तो सांगतो, "मी कधीच दारू प्यायलो नाही. पण माझ्या मित्रांमुळे दारू प्यायल्यानंतर लोक कसे वागतात याची मला चांगलीच कल्पना आहे. ही भूमिका साकारताना ती खोटी वाटणार नाही यासाठी मी सतत प्रयत्न करतो. माझ्या एका मित्राचे ब्रेकअप झाले होते आणि त्यानंतर तो खूप दारू प्यायचा. त्यावेळी तो कसा बोलायचा, काय बोलायचा याची मला चांगली जाणीव आहे. या सगळ्याची मला भूमिका साकारताना खूप मदत झाली."