या अभिनेत्रीसह काम करण्याची झिनल बेलाणीची इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 14:52 IST2017-04-19T09:22:37+5:302017-04-19T14:52:37+5:30

प्रत्येक कालाकाराची एक  आदर्श अभिनेत्री किंवा अभिनेत्री असते.त्या व्यक्तीला आदर्शमानत त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात वाटचाल करत असतात. झिनल ...

The desire of Belalani to work with this actress | या अभिनेत्रीसह काम करण्याची झिनल बेलाणीची इच्छा

या अभिनेत्रीसह काम करण्याची झिनल बेलाणीची इच्छा

रत्येक कालाकाराची एक  आदर्श अभिनेत्री किंवा अभिनेत्री असते.त्या व्यक्तीला आदर्शमानत त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात वाटचाल करत असतात. झिनल बेलाणीही एका अभिनेत्रीला आदर्श मानते. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून सुप्रिया पाठक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत झिनलला आपले करिअर घडवायचे आहे. सुप्रिया पाठक यांच्याप्रमाणेच झिनलने अनेक नाटकांतून भूमिका साकारल्या असून सुप्रिया प्रमाणेच ती सुध्दा गुजराती भाषिक आहे. त्यामुळे सुप्रिया पाठक हिच्याबरोबर एकत्र भूमिका साकारून तिच्याकडून अभिनयासंबंधी गोष्टी शिकण्याची तिची इच्छा आहे. आपल्या या इच्छेबद्दल झिनल म्हणाली, “सुप्रिया पाठकसह एकदा तरी काम करण्याची इच्छा आहे.हे एकच स्वप्न मी अनेक वर्षं उराशी बाळगून आहे. मी इतक्या गुजराती नाटकं आणि चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत, पण त्यात एकदाही मला सुप्रिया पाठकबरोबर काम करण्याची संधी मिळाली नाही.त्या माझ्या अत्यंत आवडत्या अभिनेत्री असून लहानपणापासून मी त्यांची असंख्य नाटकं, चित्रपट आणि मालिका पाहिल्या आहेत. 

त्यांच्यापासून  प्रेरणा घेत मी अभिनेत्री म्हणून घडण्याचा प्रयत्न करत आहे. चित्रीकरणप्रसंगी ‘अ‍ॅक्शन’ आणि ‘कट’ या शब्दांमध्ये त्या पूर्णपणे वेगळ्य़ाच व्यक्ती बनून जातात, असं मी ऐकलं आहे. त्या खूपच छान अभिनेत्री असून मला त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळेल.”‘हर मर्द का दर्द’ या  विनोदी मालिकेत झिनलला जेव्हा सोनू या मध्यमवर्गीय गृहिणीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, तेव्हा झिनलला सुप्रिया यांची ‘खिचडी’ या मालिकेतील 'हंसा' या  भूमिकेची आठवण आली. कारण त्यात सुप्रियाने अशाच एका मध्यमवर्गीय गुजराती गृहिणीची भूमिका साकारली होती. त्यामुळे झिनलने त्या मालिकेचे काही भाग पाहिले त्यानुसार तिने ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला होता. 

Web Title: The desire of Belalani to work with this actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.