रवी बनला डिझायनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 11:46 IST2016-07-02T06:16:54+5:302016-07-02T11:46:54+5:30
जमाई राजा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा रवी दुबे आता डिझायनरही बनला आहे. रवीला एका पुरस्कार सोहळ्यात बाजीराव मस्तानी ...
.jpg)
रवी बनला डिझायनर
ज ाई राजा या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा रवी दुबे आता डिझायनरही बनला आहे. रवीला एका पुरस्कार सोहळ्यात बाजीराव मस्तानी या चित्रपटातील मल्हारी या गाण्यावर नृत्य करायचे होते. या नृत्यात गुरमित चौधरीही त्याला साथ देणार होता. या परफॉर्मन्ससाठी जवळजवळ सात-आठ वेगवेगळे कॉस्च्युम डिझायनरने बनवले होते. पण काही केल्या ते रवीला पसंत पडत नव्हते. त्या सगळ्यांचे वजन खूपच जास्त होते आणि त्यामुळे रवीला त्याचे नृत्य चांगल्याप्रकारे सादर करता येणार नाही असे त्याचे म्हणणे होते. त्यामुळे त्याने या नृत्यासाठी स्वतःचे कपडे स्वतःच डिझाईन करायचे ठरवले. त्याने साध्या लेदरच्या पँटची आणि टी-शर्टची यासाठी निवड केली. एवढेच नव्हे तर या कपड्यांसोबत कोणते अॅक्सेसरीज चांगली दिसतील हेदेखाील त्यानेच ठरवले.