Bus Bai Bus: तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का हो मॅडम? मिसेस फडणवीसांनी काय दिलं उत्तर..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 11:45 IST2022-08-04T11:44:46+5:302022-08-04T11:45:12+5:30

Bus Bai Bus Show : झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या शोच्या तिसऱ्या भागात अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात त्या अनेक खुलासे करताना दिसणार आहे.

deputy cm Devendra Fadnavis wife Amruta Fadnavis IN Bus Bai Bus Show | Bus Bai Bus: तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का हो मॅडम? मिसेस फडणवीसांनी काय दिलं उत्तर..?

Bus Bai Bus: तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का हो मॅडम? मिसेस फडणवीसांनी काय दिलं उत्तर..?

Amruta Fadanvis on Zee Marathi : राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मिसेस फडणवीस चर्चेत असतात. होय, आम्ही बोलतोय ते अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्यबद्दल.  सध्या ‘बस बाई बस’ ( Bus Bai Bus Show) या कार्यक्रमामुळे अमृता चर्चेत आहेत. झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या शोच्या तिसऱ्या भागात अमृता फडणवीस हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमात त्या अनेक खुलासे करताना दिसणार आहे.

‘बस बाई बस’  या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता तिसऱ्या भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस दिसणार आहेत. नुकतंच या कार्यक्रमाचे काही प्रोमो झी मराठीने शेअर केले आहेत. यात अमृता अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देताना दिसत आहेत.


 
प्लास्टिक सर्जरी केली आहे का हो मॅडम?
कार्यक्रमात एका चाहतीने अमृता यांना प्लास्टिक सर्जरीबद्दल प्रश्न केला. यावर अमृता म्हणतात, ‘चांगलं झालं तुम्ही विचारलं. मला ट्रोल तर खूप लोकांनी याबाबतीत केलंय. प्लास्टिक सर्जरी ही खूप हिमतीची गोष्ट आहे.  त्यात एक रिस्क आहे. काही बिघडलं तर तुमचे सगळे फिचर्स बिघडू शकतात. तुम्हाला सांगते लग्नाच्या आधी मी कधी ब्युटी पार्लरला पण नाही जायचे. लग्नात जे काही मेकअप करवतात, तेवढं मी केलं. त्यानंतरही देवेन्द्र असे आहे ना की त्यांना स्त्रीचा चेहरा किंवा बाकी काही पाहत नाही. ते फक्त मन पाहतात.’

 देर आये दुरुस्त आए...
याच शोमध्ये अमृता अप्रत्यक्ष टोलेबाजी करतानाही दिसल्या. कार्यक्रमात त्यांना ‘देर आये दुरूस्त आए’ या एका म्हणीचा अर्थ विचारण्यात आला. यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘ज्यांना यायचं होतं ते आलेच नाहीत आणि जे आले ते येणारच होते...’ त्यांचं हे उत्तर ऐकून सर्वजण थक्क झाले. त्यांचा इशारा कोणाकडे होता, हे नव्याने सांगायला नकोच. अमृता फडणवीसांच्या या उत्तरावर प्रेक्षकांनी खळखळून हसत दाद दिली.  

Web Title: deputy cm Devendra Fadnavis wife Amruta Fadnavis IN Bus Bai Bus Show