'मन उडू उडू झालं' मालिकेनंतर दीपू आणि इंद्रा दिसणार पुन्हा एकत्र, चाहते झाले खूश्श!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 18:17 IST2022-09-12T18:16:16+5:302022-09-12T18:17:18+5:30
Ajinkya Raut And Hruta Durgule:अजिंक्य राऊत आणि हृता दुर्गुळेच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. लवकरच ते दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. मात्र यावेळी ते मालिकेत नाही तर चित्रपटात दिसणार आहेत.

'मन उडू उडू झालं' मालिकेनंतर दीपू आणि इंद्रा दिसणार पुन्हा एकत्र, चाहते झाले खूश्श!
छोट्या पडद्यावरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) या मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. काही दिवसांपूर्वी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील इंद्रा आणि दिपू यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली होती. इंद्राची भूमिका अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut)ने साकारली आहे. तर दिपूची भूमिका हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने निभावली होती. अजिंक्य आणि हृताच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. लवकरच ते दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. मात्र यावेळी ते मालिकेत नाही तर चित्रपटात दिसणार आहेत.
हृता दुर्गुळेचा आज वाढदिवस असून या निमित्ताने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ती कन्नी या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्रीनं इंस्टाग्रामवर चित्रपटात मोशन पोस्टर शेअर करुन लिहिले की, माझ्या मोठ्या पडद्यावरील आगामी प्रोजेक्टची आज घोषणा करण्यात आली. उंच आकाशात उडायचं तर हवी मैत्रीची...प्रेमाची...जि्ददीची...कन्नी. यापेक्षा चांगली वाढदिवसाची काय भेट असू शकते !!!!! या सुंदर गिफ्टसाठी टीमचे आभार.
कन्नी चित्रपटात हृता आणि अजिंक्य व्यतिरिक्त शुंभाकर तावडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर हेमंत जोशी यांनी केले आहे. या चित्रपटात हृता आणि अजिंक्य कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. त्या दोघांना रुपेरी पडद्यावर पुन्हा एकत्र काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर हृता दुर्वा, मन उडू उडू झालं मालिकेशिवाय अनन्या, टाईमपास ३ या चित्रपटात झळकली. तर अजिंक्य राऊत याने विठू माऊली आणि मन उडू उडू झालं या मालिकेव्यतिरिक्त टकाटक २ चित्रपटात झळकला आहे.