'मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पादुकोणची हजेरी, पण......!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 11:52 IST2020-01-15T11:47:21+5:302020-01-15T11:52:28+5:30

इतकंच नाही तर या अनोख्या संगीत मैफलीत दीपिका स्वत:ही सामील झाली. धमाकेदार गाणी सादर करत दीपिकाने या मैफलीत अनोखे रंग भरले.

 Deepika Padukone's Presence on the stage of 'Me Honar superstar' | 'मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पादुकोणची हजेरी, पण......!

'मी होणार सुपरस्टार’च्या मंचावर दीपिका पादुकोणची हजेरी, पण......!

‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. नुकतंच या कार्यक्रमात खास हजेरी लावली ती दीपिका पडुकोणने. 'छपाक' सिनेमाच्या प्रमोशनसाठी दीपिका मी होणार सुपरस्टारच्या सेटवर आली होती. दीपिकाचं सेटवर आगमन होताच सगळा माहोलच बदलून गेला. स्पर्धकांची गाणी ऐकत, त्यांचा उत्साह वाढवत दीपिकाने या मंचावर धमाल उडवून दिली. इतकंच नाही तर या अनोख्या संगीत मैफलीत दीपिका स्वत:ही सामील झाली. धमाकेदार गाणी सादर करत दीपिकाने या मैफलीत अनोखे रंग भरले.


खास बात म्हणजे दीपिकासाठी आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे यांनी देखिल खास गाणी सादर केली,  आणि या गाण्यांना दीपिका आणि प्रेक्षकवर्गाकडून दिलखुलास वन्समोअर मिळाला. १९ जानेवारीच्या विशेष भागात दीपिकासोबतची ही खास मैफल पाहायला मिळणार आहे.
आदर्श शिंदे, राहूल देशपांडे,  मृणाल कुलकर्णी हा शो जज करत असून पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडत आहे. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.

या अनोख्या कार्यक्रमाविषयी सांगताना कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडेने सांगितले की, ‘टॅलेण्ट ही अशी गोष्ट आहे ज्याचा कधीही विसर पडत नाही. काही जणांना मात्र आर्थिक परिस्थितीमुळे, घरच्यांचा पाठिंबा न मिळाल्यामुळे आणि अशा बऱ्याच कारणांमुळे आपलं स्वप्न पूर्ण करता येत नाही. ‘मी होणार सुपरस्टार’ हा कार्यक्रम अशाच स्पर्धकांना दुसरी संधी देत आहे ज्यांचं गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. संगीत क्षेत्रातले दिग्गज हा कार्यक्रम जज करणार आहेत त्यामुळे स्पर्धकांचं स्वप्न खऱ्या अर्थाने सत्यात उतरणार आहे. आयुष्यात कधीना कधी दुसरी संधी ही मिळतेच. गाण्याचं 

Web Title:  Deepika Padukone's Presence on the stage of 'Me Honar superstar'