दीपिका कक्करने दिला मुलाला जन्म, प्रि-मॅच्युअर डिलीव्हरी झाल्याने शोएब म्हणतो, 'काळजी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:47 IST2023-06-21T12:45:11+5:302023-06-21T12:47:58+5:30

गेल्या काही महिन्यांपासून दीपिका प्रेग्नंसी दरम्यानचे अनेक व्हिडिओ शेअर करत होती.

Deepika Kakkar gave birth to a baby boy husband shoaib ibrahim posts its a pre mature delivery | दीपिका कक्करने दिला मुलाला जन्म, प्रि-मॅच्युअर डिलीव्हरी झाल्याने शोएब म्हणतो, 'काळजी...'

दीपिका कक्करने दिला मुलाला जन्म, प्रि-मॅच्युअर डिलीव्हरी झाल्याने शोएब म्हणतो, 'काळजी...'

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर (Deepika Kakkar) आणि शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) यांच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आज सकाळीच दीपिकाने मुलाला जन्म दिला. दीपिकाची प्रिमॅच्युअर डिलीव्हरी झाली मात्र काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती शोएबने पोस्ट शेअर करत दिली आहे. दीपिका आणि मुलगा दोघंही सुखरुप आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून दीपिका प्रेग्नंसी दरम्यानचे अनेक व्हिडिओ शेअर करत होती. काही कारणाने तिला ट्रोलही केले गेले होते. मात्र आज दीपिका आणि शोएबसाठी खूप खास दिवस आहे. लग्नानंतर ५ वर्षांनी त्यांच्या घरी पाळणा हलला आहे. कपलने कालच शोएबचा वाढदिवस साजरा केला होता. दीपिकाने हा दिवस खूप खास बनवला होता. बर्थडे पार्टीची झलकही व्हिडिओ पोस्ट करुन दिली होती. तर अभिनेत्रीने एक भावनिक पोस्ट शेअर केली. वाढदिवस साजरा केल्यानंतर दीपिकाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज पहाटेच तिने मुलाला जन्म दिला. प्रिमॅच्युअर डिलीव्हरी झाल्याने कुटुंबीय काळजीत होते. मात्र नंतर आई आणि मुलगा दोघंही सुखरुप असल्याचं कळताच सर्वांना आनंद झाला.

दीपिका कक्करने जानेवारीमध्ये तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. तिच्या फोटोशूटचा एक सुंदर फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत अभिनेत्रीने लिहिले की, 'ही बातमी तुम्हा सर्वांसोबत कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थतेने शेअर करत आहे. हा आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा आहे. होय, आम्ही आमच्या पहिल्या बाळाची अपेक्षा करत आहोत. तुमच्या प्रार्थना आणि प्रेमाची खूप गरज आहे. दीपिका कक्कडने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी शोएब इब्राहिमसोबत लग्न केले.

Web Title: Deepika Kakkar gave birth to a baby boy husband shoaib ibrahim posts its a pre mature delivery