अखेर 'रंग माझा वेगळा'मधील दीपाला खऱ्या आयुष्यात मिळाला पार्टनर, त्याला पाहून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 07:00 IST2021-10-31T07:00:00+5:302021-10-31T07:00:00+5:30

रेश्मा शिंदे हिने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे.

Deepa finally got a real life partner in 'Rang Mazha Vegla', you will be shocked to see him | अखेर 'रंग माझा वेगळा'मधील दीपाला खऱ्या आयुष्यात मिळाला पार्टनर, त्याला पाहून व्हाल हैराण

अखेर 'रंग माझा वेगळा'मधील दीपाला खऱ्या आयुष्यात मिळाला पार्टनर, त्याला पाहून व्हाल हैराण

छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' मालिकेने कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील दीपा या पात्राने आपल्या प्रेमळ स्वभावाने रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. रेश्मा शिंदेला दीपाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. दिवसेंदिवस सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. रेश्माच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. नुकताच एक व्हिडीओ रेश्माने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

रेश्मा शिंदे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करून तिने लिहिले की, कपल गोल्स. अखेर मला पार्टनर मिळाला आहे, ज्याकडे माझे मी नखरे करेन. या व्हिडीओत रेश्मा शिंदेच्या मागे श्रेक हा अॅनिमेटेड कॅरेक्टर पाहायला मिळत आहे. रेश्मा शिंदेच्या या मजेशीर व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. 


रेश्मा शिंदे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतून रेश्माला खूप लोकप्रियता मिळाली आहे.  नांदा सौख्यभरे, चाहूल या मालिकेत ती काम करताना दिसली आहे. 'केसरी नंदन' या हिंदी मालिकेतही तिने प्रमुख भूमिका केली होती. 'लालबागची राणी' या चित्रपटातही ती दिसली आहे.

Web Title: Deepa finally got a real life partner in 'Rang Mazha Vegla', you will be shocked to see him