नवव्या वर्षात पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2016 16:39 IST2016-07-29T11:09:47+5:302016-07-29T16:39:47+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना ...
.jpg)
नवव्या वर्षात पदार्पण
त रक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीची आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले आहे. या मालिकेने गुरुवारी आठ वर्षं पूर्ण केले. कोणत्याही कॉमेडी मालिकेने इतकी वर्षं लोकांचे मनोरंजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमने केक कापून आपला हा आनंद व्यक्त केला. या मालिकेचे चित्रीकरण आठ वर्षं करत असल्याने या मालिकेची संपूर्ण टीम ही आमच्यासाठी एक कुटुंबच बनले आहे असे या मालिकेतील कलाकारांचे म्हणणे आहे.