n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">मकडी, लगान, गुलाम यांसारख्या चित्रपटात आणि अनेक मालिकेत काम करणारा अभिनेता दयाशंकर पांडे आता बहू हमारी रजनी_कांत या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत तो एका भोंदूबाबाची भूमिका साकारणार आहे. या भोंदूबाबाचे खरे रूप रजनीला कळल्यावर ती त्याचा पर्दाफाश करणार आहे. या भूमिकेविषयी दयाशंकर सांगतो, "मालिकेतील माझी भूमिका काहीच भागाची असली तरी ती खूप चांगली असल्याने मी ती स्वीकारली. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक राजेंद्र चावला यांच्यासोबत मी 15 वर्षांपूर्वी काम केले होते. त्यांच्यासोबत पुन्हा काम करताना मला खूप मजा आली."