‘दिया और बाती’वर सिनेमा बनणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2016 11:21 IST2016-07-28T05:51:17+5:302016-07-28T11:21:17+5:30
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो दिया और बाती हम लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.मात्र लवकरच या मालिकेचं दुसरं पर्वही रसिकांच्या ...

‘दिया और बाती’वर सिनेमा बनणार ?
tyle="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो दिया और बाती हम लवकरच रसिकांचा निरोप घेणार आहे.मात्र लवकरच या मालिकेचं दुसरं पर्वही रसिकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा आहेत. असं असलं तरी रसिकांची लाडकी संध्या अर्थात अभिनेत्री दीपिका सिंग मात्र या दुस-या पर्वात दिसणार नाही. या मालिकेचं दुसरं पर्व आणण्याऐवजी निर्मात्यांनी या मालिकेवर आधारित सिनेमा आणावा अशी काहीशी इच्छा संध्या अर्थात दीपिकानं व्यक्त केलीय. इतकंच नाही तर हा सिनेमा आलाच तर त्यात आपण साकारलेली आयपीएस अधिकारी संध्याची भूमिका अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनं साकारावी अशी इच्छा दीपिकानं व्यक्त केलीय. संध्या ही व्यक्तीरेखा प्रभावशाली असून तिनं संसार आणि करियर याचा योग्य मेळ घालत यश मिळवलंय. संध्याची व्यक्तीरेखा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरु शकते आणि त्यामुळं ही भूमिका भूमीसारख्या प्रतिभावंत अभिनेत्रीनं साकारावी असंही दीपिका सिंगनं नमूद केलंय. आता दीपिकाची ही सूचना निर्माते गांभीर्यानं घेऊन मालिकेवर सिनेमा बनवतात का हे पाहणं रंजक ठरणार आहे.