असा असणार बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 12:20 IST2018-06-05T06:49:52+5:302018-06-05T12:20:06+5:30

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉसने घरातील सदस्यांना “हाजीर तो वझीर” हे नॉमिनेशनचे कार्य दिले होते. ज्यानुसार सेफ ...

This is the day in the Big Boss Marathi house! | असा असणार बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस!

असा असणार बिग बॉस मराठीच्या घरातील आजचा दिवस!

ग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉसने घरातील सदस्यांना “हाजीर तो वझीर” हे नॉमिनेशनचे कार्य दिले होते. ज्यानुसार सेफ झोनमध्ये फक्त चारच सदस्य असू शकतात.ज्यामध्ये मेघा, पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा हे चार सदस्य प्रथम त्या सेफ झोन मध्ये जाऊन बसले. त्यानंतर या प्रक्रियेनुसार बिग बॉस सहा बझर वाजवणार आणि प्रत्येक बझरला कोणी एका सदस्याने त्या सेफ झोन मधून बाहेर येणे अनिवार्य होते तसेच बाहेरील सदस्यांपैकी कोणी एक सदस्य सेफ झोनमध्ये जाणे अपेक्षित होते. काल सेफ झोन मधून मेघा, आस्ताद, रेशम आणि त्यागराज बाहेर आले त्यामुळे हे सदस्य घरातून घराबाहेर होण्याच्या प्रकियेमध्ये नॉमिनेट झाले आहे असे वाटत आहे. आज कोण नॉमिनेट होणार ? कोण सुरक्षित होणार ? हे पाहणे रंजक असणार आहे.तसेच बिग बॉस घरातील सदस्यांना अजून एक कार्य देणार आहेत.त्यामुळे आजचा हा भाग अधिक रंजक असणार हे मात्र नक्की.
 

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांवर आज बिग बॉस लक्झरी बजेट कार्य सोपवणार आहेत, ज्याचे नाव “मिशने ए कुशन” असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज भरणार कुशन बाझार.कॅप्टनसीच्या प्रक्रियेत या टास्कची मोलाची भूमिका असणार आहे.या कार्याअंतर्गत रेशम आणि सई कुशन फॅक्टरी चालवणाऱ्या दोन प्रतिस्पर्धी व्यापारी असणार आहेत. घरातील इतर सर्व सदस्य या कार्यामध्ये उषा बनविणारे कर्मचारी असतील. कार्यादरम्यान बिग बॉस वेळोवेळी उषा बनविण्याच्या ऑर्डरस देतील. या उषा बनवून घेण्यासाठी कर्मचार्यांना मेहेनताना देण्याचं काम या दोन्ही व्यापारांचं आहे.त्यामुळे आता घरातील सदस्य हे कार्य कसे पार पाडतील ? कोणामध्ये वाद होतील ? कोणते सदस्य रेशमच्या बाजूने काम करतील ? तर कोणते सईच्या ? हे बघणे रंजक असणार आहे. या कार्या दरम्यान मेघा आणि रेशम मध्ये वाद रंगणार आहे.

जुई गडकरी या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडली. तिला एक विशेष अधिकार देण्यात आला आणि तो म्हणजे जुई कोणा एका सदस्याला पुढच्या एका आठवड्यासाठी शिक्षा देऊ शकते मग ती कुठलीही शिक्षा असेल त्या सदस्याला ती पूर्ण करणे भाग असेल. जुईने सईला शिक्षा दिली पुढील एक आठवडा कॉफी न पिण्याची. आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होणार याचीही उत्सुकता अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: This is the day in the Big Boss Marathi house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.