लग्नासाठी दत्तू मोरेच्या सासऱ्यांचा होता विरोध, मग अभिनेत्यानं अशी काढली समजूत; म्हणाला - 'पळून जाणं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 14:22 IST2023-06-07T14:22:04+5:302023-06-07T14:22:40+5:30

दत्तू मोरे (dattu more) स्वाती घुनागेसोबत २३ मे रोजी विवाहबंधनात अडकला आहे.

Dattu More's father-in-law was opposed to the marriage, then the actor came to an agreement; Said - 'Escape...' | लग्नासाठी दत्तू मोरेच्या सासऱ्यांचा होता विरोध, मग अभिनेत्यानं अशी काढली समजूत; म्हणाला - 'पळून जाणं...'

लग्नासाठी दत्तू मोरेच्या सासऱ्यांचा होता विरोध, मग अभिनेत्यानं अशी काढली समजूत; म्हणाला - 'पळून जाणं...'

महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला विनोदवीर म्हणजे दत्तू मोरे (dattu more) . आजवर प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या दत्तूने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. तो स्वाती घुनागेसोबत २३ मे रोजी विवाहबंधनात अडकला आहे. नुकतेच एका मुलाखतीत दत्तू आणि स्वाकीने त्यांच्या लग्नादरम्यानचे किस्से सांगितले.

दत्तू मोरेने पत्नी स्वाती घुनागेसोबत इट्स मज्जा या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नादरम्यानचा किस्सा सांगितला. त्यांच्या लग्नाला दत्तूच्या सासऱ्यांचा विरोध असल्याचा खुलासा दत्तूने केला. यावेळी स्वाती म्हणाली, मी लग्नाबाबत घरी सांगितल्यावर आईने लगेच होकार दिला. मात्र बाबा या लग्नासाठी तयार नव्हते. कारण माझ्या घरचे सगळे डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टर जावई हवा होता. पण दत्तू भेटल्यानंतर त्यांनी लग्नाला होकार दिला.

मग लग्नासाठी दिला होकार
त्यानंतर दत्तूने सांगितले की, मी स्वातीच्या वडिलांना भेटलो आणि त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पळून जाणे आपल्याला शोभणार नाही. तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत त्या मला सांगा. मला कोणतेही व्यसन नाही. त्यानंतर मग कोणतीही अट न ठेवता त्यांनी लग्नासाठी होकार दिला.

बाबांना मी १०-१२ दिवस आधी लग्नाची कल्पना दिली
तर दत्तूने त्याच्या वडिलांना १०-१२ दिवस आधी लग्नाची कल्पना दिली होती. याबद्दल तो म्हणाला की, लव्ह मॅरेज हा आपला प्रॉब्लेम आहे. लग्नाबद्दल मी सगळ्यात आधी आईला सांगितले. बाबांना मी १०-१२ दिवस आधी लग्नाची कल्पना दिली. कारण ते भडकणार होते, हे मला माहीत होते. समाजाचा विचार आणि लव्ह मॅरेज असल्यामुळे आई सुरुवातीला नाही म्हणत होती. पण माझ्या तीन बहिणींनी तिला समजावलं आणि मग ती तयार झाली.

Web Title: Dattu More's father-in-law was opposed to the marriage, then the actor came to an agreement; Said - 'Escape...'