'पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; किरण मानेंचा डॅशिंग अंदाज, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 19:05 IST2023-11-08T19:05:11+5:302023-11-08T19:05:35+5:30

Kiran mane: किरण माने लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Dashing look of marathi actor Kiran Mane will soon be seen in a new role | 'पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; किरण मानेंचा डॅशिंग अंदाज, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

'पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; किरण मानेंचा डॅशिंग अंदाज, लवकरच दिसणार नव्या भूमिकेत

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे किरण माने. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा विविध माध्यमातून त्यांनी कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अलिकडेच ते सिंधुताई माझी आई- गोष्ट चिंधीची' या मालिकेत झळकले होते. या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला विशेष प्रेम मिळालं. त्यानंतर आता ते पुन्हा एका नव्या प्रोजेक्ट माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
 

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टमध्ये ते एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

"आणखी एक भन्नाट भुमिका ! नादखुळा लूक. पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त... स्टे ट्यून्ड", असं कॅप्शन देत किरण माने यांनी त्यांच्या आगामी प्रोजेक्टची माहिती दिली आहे.

दरम्यान, किरण माने यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ते कमालीचे डॅशिंग दिसत आहेत. त्यामुळे ते नेमके कोणत्या सिनेमात दिसणार की मालिकेत हे जाणून घेण्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Web Title: Dashing look of marathi actor Kiran Mane will soon be seen in a new role