'ही पोरी कोणाची?', ‘लागीर झालं जी’ फेम अज्याचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 16:17 IST2021-07-09T16:15:33+5:302021-07-09T16:17:08+5:30

अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण सध्या कोणत्याच मालिकेत काम करताना दिसत नाही. तरीदेखील तो चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आहे.

Dance video of 'Lagir Zhalam Ji' fame Ajyacha's song 'Hi Pori Konachi' goes viral | 'ही पोरी कोणाची?', ‘लागीर झालं जी’ फेम अज्याचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

'ही पोरी कोणाची?', ‘लागीर झालं जी’ फेम अज्याचा डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

‘लागीर झालं जी’ फेम अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण बऱ्याच दिवसांपासून सातत्याने चर्चेत येतो आहे. सध्या तो अभिनयापेक्षा सोशल मीडियावरील त्याच्या डान्स व्हिडीओमुळे जास्त चर्चेत येतो आहे. त्यामुळे नितीश चव्हाणचा सोशल मीडियावर खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग निर्माण झाला आहे. नुकताच नितीशने ही पोरी कोणाची या गाण्यावर डान्स केला आहे, जो खूप व्हायरल होताना दिसत आहे.

अज्या म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण सध्या कोणत्याच मालिकेत काम करताना दिसत नाही. तरीदेखील तो चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेत आहे. त्याचा सध्या सोशल मीडियावर एकापेक्षा एक दमदार डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतो. त्याच्या डान्सला चाहत्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.


नितीश चव्हाणने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेयर केला आहे. यात तो ‘ही पोरी कोणाची’ या गाण्यावर धमाल डान्स करताना दिसतो आहे. या गाण्यावर त्याच्यासोबत त्याची मैत्रीण श्वेता राजन डान्स करताना दिसते आहे. या दोघांची जोडी नेहमीच डान्स व्हिडीओ शेअर करत असते आणि त्यांच्या डान्सला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.


छोट्या पडद्यावरील ​‘लागीर झालं जी’ मालिका खूप लोकप्रिय ठरली होती. याच मालिकेतून नितीश चव्हाणने रसिकांच्या मनात घर केले होते. मालिका बंद झाली असली तरीही आजही अज्याने प्रेक्षकाच्या मनात घर कायम केले आहे. अजिंक्यचा लूक ऑनस्क्रीन लूक प्रेक्षकांमध्ये विशेषतः तरुणींना खूपच भावला. नितीश चव्हाण डॅशिंग लूकमुळेही चर्चेत असतो. 

Web Title: Dance video of 'Lagir Zhalam Ji' fame Ajyacha's song 'Hi Pori Konachi' goes viral