'डान्स दिवाने'च्या मंचावर 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितला रडू कोसळलं, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 14:10 IST2024-02-23T14:10:38+5:302024-02-23T14:10:57+5:30

एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

'Dance Deewane 4: Madhuri Dixit, Suniel Shetty Gets Emotional by performance | 'डान्स दिवाने'च्या मंचावर 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितला रडू कोसळलं, पाहा व्हिडीओ

'डान्स दिवाने'च्या मंचावर 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितला रडू कोसळलं, पाहा व्हिडीओ

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' (Bollywood Dhak-Dhak Girl)  माधुरी दीक्षित(Madhuri Dixit)  आजही तितकीच तरुण आणि सुंदर आहे. आजही माधुरीचे लाखो चाहते आहेत. माधुरीच्या अभिनयासोबतचं तिच्या डान्सने सुद्धा चाहत्यांना वेड लावलं आहे. तिच्या अदाकारीने चाहत्यांच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. सध्या माधुरी दीक्षित 'डान्स दिवाने 4' (Dance Diwane 4) या कार्यक्रमामध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. पण, नुकतेच  'डान्स दिवाने 4' माधुरी रडल्याचं पाहायला मिळालं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

नुकतेच 'डान्स दिवाने 4'  या शोचा एक लेटेस्ट प्रोमो रिलीज झाला आहे. जो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित रडताना पाहायला मिळत आहेत. माधुरीसोबतच ॲक्शन हिरो सुनील शेट्टीही भावूक झाल्याचं दिसून येत आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये दिसते की, कार्यक्रमाती दोन स्पर्धकांनी हृतिक रोशनच्या 'अग्निपथ' चित्रपटातील 'अभी मुझे मैं कही' या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. त्यांचा भावनिक परफॉर्मन्स पाहून माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी दोघांनाही रडू कोसळलं. 

प्रोमो व्हिडीओमध्ये माधूरी डोळे पुसताना दिसून येत आहे. हा प्रोमो खूपच भावनिक असून याला चाहत्यांनी खूप पंसती दिली आहे. डान्स रियालिटी शो 'डान्स दिवाने'चा हा चौथा सीझन आहे, ज्यामध्ये माधुरी दीक्षित आणि सुनील शेट्टी हे जजच्या भूमिकेत आहेत. तर कॉमेडियन भारती सिंह शो होस्ट करत आहेत. ३ फेब्रुवारीपासून कलर्स टीव्हीवर या शोचे प्रसारण सुरू झालं असून याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
 

Web Title: 'Dance Deewane 4: Madhuri Dixit, Suniel Shetty Gets Emotional by performance