ऑडिशनसाठी आदल्या दिवसापासून गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 17:18 IST2016-05-27T11:48:34+5:302016-05-27T17:18:34+5:30
डान्स प्लस या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काहीच दिवसांत सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी सध्या विविध शहरांमध्ये ऑडिशन घेतले जात ...
.jpg)
ऑडिशनसाठी आदल्या दिवसापासून गर्दी
ड न्स प्लस या कार्यक्रमाचा दुसरा सिझन काहीच दिवसांत सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी सध्या विविध शहरांमध्ये ऑडिशन घेतले जात आहे. मुंबईच्या ऑडिशनच्यावेळी या कार्यक्रमाच्या टीमला एक वेगळाच अनुभव आला. दुसऱया दिवशीच्या ऑडिशनची तयारी करण्यासाठी कार्यक्रमाची टीम ऑडिशनच्या ठिकाणावर गेली असता त्यांना एक आश्चर्याचा धक्का बसला. कारण ऑडिशनच्या ठिकाणी जवळजवळ हजार लोक उपस्थित होते. ऑडिशनसाठी आदल्या दिवसापासून ते तिथे ठाण मांडून बसले होते. टीममधील मंडळीने लगेचच ही गोष्ट रेमोला कळवली. लोकांचे कार्यक्रमाबद्दल हे प्रेम पाहून रेमोदेखील आश्चर्यचकित झाला.