"गुलाबी साडी" गाण्यावर थिरकली चहलची पत्नी, धनश्रीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 19:00 IST2024-03-26T18:59:41+5:302024-03-26T19:00:12+5:30
धनश्री वर्मा हिलाही या मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. धनश्रीने 'गुलाबी साडी' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे.

"गुलाबी साडी" गाण्यावर थिरकली चहलची पत्नी, धनश्रीचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंडिंग होत असतात. सध्या 'गुलाबी साडी' हे गाणं ट्रेंडमध्ये आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. माधुरी दीक्षितपासून ते अदा शर्मापर्यंत अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसले. मराठी सेलिब्रिटींनीही 'गुलाबी साडी' गाण्यावर रील बनवले आहेत. आता भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा हिलाही या मराठी गाण्याची भुरळ पडली आहे.
चहलची पत्नी धनश्री एक उत्तम डान्सर आहे. ती सोशल मीडियावर तिचे अनेक रील व्हिडिओ शेअर करत असते. धनश्रीने 'गुलाबी साडी' गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. तिने गुलाबी रंगाचा लखनवी कुर्ता परिधान केल्याचं दिसत आहे. 'गुलाबी साडी' गाण्यावर ती डान्स करताना दिसत आहे. तिचे डान्स मुव्ह्स पाहून चाहतेही अवाक् झाले आहेत. 'गुलाबी साडी' गाण्यावरील धनश्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, धनश्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिच्या डान्ससाठी ती ओळखली जाते. 'झलक दिखला जा' या रिएलिटी शोमध्येही ती दिसली होती. या शोमध्ये धनश्रीने तिच्या डान्सचा जलवा दाखवला होता. अनेकदा धनश्री भारतीय क्रिकेट संघातील क्रिकेटर्सबरोबर रील व्हिडिओ करताना दिसते.