दीपक चहरची बहिणीसाठी खास पोस्ट, म्हणाला "प्रिय मालती तू 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलावी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:34 IST2025-11-14T19:34:16+5:302025-11-14T19:34:44+5:30
मालती चहर ही भारतीय क्रिकेटर दीपक चहरची बहीण आहे. आता तिच्यासाठी क्रिकेटरनं खास पोस्ट शेअर केली आहे.

दीपक चहरची बहिणीसाठी खास पोस्ट, म्हणाला "प्रिय मालती तू 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलावी..."
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान होस्ट करत असलेला टीव्ही रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' सध्या तुफान हीट ठरत आहे. १९ व्या या सिझनला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 'बिग बॉस'च्या फिनालेला काही दिवस शिल्लक राहिले आहेत. घरातील प्रत्येक सदस्याने आपला एक चाहतावर्ग निर्माण केलाय. 'बिग बॉस १९' मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली अभिनेत्री मालती चहर सध्या जोरदार चर्चेत आहे. मालती चहर ही भारतीय क्रिकेटर दीपक चहरची बहीण आहे. आता तिच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटरनं आपल्या बहिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
दीपक चहरनं सोशल मीडियावर मालतीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यानं लिहलं, "हॅपी बर्थडे प्रिय मालती... देव तुझे भले करो आणि तू 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी उचलावी, याच शुभेच्छा! आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. असंच धमाकेदार परफॉर्म करत रहा आणि सगळ्यांचं मनोरंजन करत रहा. मित्रांनो, तिच्यासाठी सर्वात मोठं बर्थडे गिफ्ट म्हणजे भरपूर मतं! कृपया तिला सपोर्ट करत राहा आणि आवर्जून मत द्या", असं आवाहनदेखील त्यांना चाहत्यांना केलं.
मालती केवळ एक अभिनेत्रीच नव्हे तर मॉडेल, कंटेंट क्रिएटर आणि फिल्ममेकरदेखील आहे. मालती २०१४ च्या फेमिना मिस इंडियामध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती आणि 'फेमिना मिस इंडिया दिल्ली २०१४'मध्ये तिने 'मिस फोटोजेनिक' हा किताबही जिंकला. २०१८ साली आलेल्या मध्ये अनिल शर्मा दिग्दर्शित 'जिनिअस' या बॉलिवूड सिनेमातून तिने डेब्यू केला होता. २०२२मध्ये तिने अरविंद पांडे दिग्दर्शित 'इश्क पश्मीना' या रोमँटिक सिनेमात काम केले होते. मालतीने अभिनयाव्यतिरिक्त लघुपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे १ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.