'काहीही करुन अक्षयला पटव'; नेमकं कोणाला म्हणाली मिनल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 16:50 IST2021-09-22T16:49:47+5:302021-09-22T16:50:26+5:30
Bigg Boss Marathi 3 : चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या टास्कदरम्यान मीनल घरातील विकास, सोनाली आणि विशाल या सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न करते.

'काहीही करुन अक्षयला पटव'; नेमकं कोणाला म्हणाली मिनल?
छोट्या पडद्यावरील बहुचर्चित ठरलेलं बिग बॉस मराठीचं तिसरं पर्व अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. १९ सप्टेंबर रोजी बिग बॉसच्या घरात नव्या स्पर्धकांनी प्रवेश केला असून आता घरात नवनवीन टास्क रंगू लागले आहेत. विशेष म्हणजे हे टास्क देण्यासोबतच आता घरातील सदस्यांचे काही ग्रुपदेखील होऊ लागल्याचं दिसून येत आहे. त्यातच 'अक्षयला पटव', असं म्हणत सेलिब्रिटी स्पर्धक मिनल सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
अलिकडेच बिग बॉसच्या सदस्यांना चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा पहिला टास्क देण्यात आला होता. या टास्कवेळी चर्चा करत असताना काहीही करुन अक्षयला पटव असं, मिनल म्हणाली. तिच्या या वाक्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 'मिनल नेमकं कोणाला अक्षयला पटव', असं सांगतीये हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
पत्नीला घटस्फोट देणारे प्रकाश राज पडले 'या' नृत्यदिग्दर्शिकेच्या प्रेमात
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड या टास्कदरम्यान मीनल घरातील विकास, सोनाली आणि विशाल या सदस्यांना समजावण्याचा प्रयत्न करते. नेमका गेम कसा झाला हे ती सांगायचा प्रयत्न करत आहे. यामध्येच तिने अक्षयला पटव असं म्हटलं आहे.
“ बझर झाल्यावर जय आणि विकास आले आणि ते मुद्द्याचं बोलून निघून गेले. कारण दुसऱ्यांना चान्स द्यायचा होता. पण, जेव्हा आविष्कार आणि उत्कर्ष आले त्यावेळी त्यांनी खूप वेळ घेतला. त्यामुळे आता दादूस आणि अक्षयला सांग की बझर होईपर्यंत तुम्ही बाहेर येऊ नका. जर अक्षय आणि दादूस अडून राहिले तर आम्ही बाहेर येणारच नाही. त्यांमुळे तू अक्षयला पटव आणि नीट सांग", असं मिनलने विशालला सांगितलं.
जॉनच्या आई-वडिलांवर आली रिक्षाने प्रवास करायाची वेळ; कारण वाचून व्हाल थक्क
दरम्यान, चिऊ ताई चिऊ ताई दार उघड हा टास्क सध्या घरात चांगलाच रंगत आहे. मात्र, या टास्कमध्ये पुढे काय होणार हे 'बिग बॉस मराठी ३' पाहिल्यावरच प्रेक्षकांना त्याच्या उलगडा होईल.