Confirm...! कपिल शर्मा होणार बाबा, डिसेंबर महिन्यात त्याच्या घरी येणार नवा पाहुणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:24 IST2019-05-24T17:23:43+5:302019-05-24T17:24:09+5:30
कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथच्या प्रेग्नेंसीबाबतची चर्चा सध्या मीडियामध्ये सुरू होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Confirm...! कपिल शर्मा होणार बाबा, डिसेंबर महिन्यात त्याच्या घरी येणार नवा पाहुणा
कपिल शर्माची पत्नी गिन्नी चतरथच्या प्रेग्नेंसीबाबतची चर्चा सध्या मीडियामध्ये सुरू होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कपिलच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
इंडियन एक्स्प्रेसला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गिन्नी बऱ्याचदा द कपिल शर्मा शोच्या सेटवर उपस्थित असते आणि तिथे कपिलची काळजीदेखील ती घेत असते. आता ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला सेटवर येत असते. तिच्या कुटुंबियांना वाटते की, कपिलने जालंदरमध्ये गिन्नीसोबत राहावे. इतकेच नाही तर त्याच्या आईला देखील गिन्नीसोबत प्रेग्नेंचीच्या काळात रहायचे आहे.
कपिल शर्माने आपल्या बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत डिसेंबर, २०१८मध्ये लग्न केले. या विवाह सोहळाला टेलिव्हिजन व बॉलिवूडमधील कलाकारांना निमंत्रण दिले होते. आपल्या कॉमिक टाइमिंगने कपिल शर्माने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. किस किसको प्यार करूं या चित्रपटातून कपिलने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो फिरंगी या चित्रपटातही पहायला मिळाला. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या सिनेमांना हवी तितकी दाद दिली नाही.
२००७ साली कॉमेडी रिएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून कपिलने आपल्या करियरची सुरूवात केली. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने कित्येक शोजमध्ये काम केले.
कॉमेडी सर्कस, झलक दिखला जा ६ व उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगली पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही आणि त्याने कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. या शोला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे.