Confirm..! हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह लवकरच करणार साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:36 IST2021-12-23T17:33:07+5:302021-12-23T17:36:05+5:30
हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने इंस्टाग्रामवर मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत.

Confirm..! हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह लवकरच करणार साखरपुडा
मराठी टेलिव्हिजनवरील (Television) प्रसिद्ध अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून हृताने बऱ्याचदा दोघांचे रोमँटिक अंदाजातील फोटो शेअर करत असते. हृताने काही दिवसांपूर्वी ‘आता दिवस उरले पाच’ अशी पोस्ट टाकत बॉयफ्रेन्ड प्रतिक शाह सोबतचा एक रोमॅन्टिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानंतर हृता आणि प्रतिक यांचे साखरपुडा ठरल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र आता कन्फर्म झाले आहे की त्या दोघांचा लवकरच साखरपुडा होणार आहे.
येत्या २५ डिसेंबर रोजी हृता आणि प्रतिक साखरपुडा करणार आहेत. हृताने इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच अभिनेत्री शाल्मली टोळये हिनेदेखील इंस्टाग्राम स्टोरीवर मेहंदीचा फोटो शेअर करत मेरे यार की सगाई है अशी कमेंट केली आहे.
प्रतिक शाह असून तो लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतिकने आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी या मालिकांसाठी त्याने काम केले आहे. प्रतिकची आई मुग्धा शाह ही देखील मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
हृता दुर्गळेने ‘दुर्वा’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर तिला खºया अर्थाने ‘फुलपाखरू’ मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. सध्या हृता ‘मन उडू उडू’ मालिकेत दीपूची भूमिका साकारते आहे.