Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 11:07 IST2025-10-15T11:06:27+5:302025-10-15T11:07:04+5:30
Tanya Mittal : बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने असे दावे केले आहेत की सर्वांनाच मोठा धक्का बसला.

Tanya Mittal : तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
तान्या मित्तल पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस १९' मध्ये जोरदार चर्चेत आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून ती जास्त लक्ष वेधून घेते. बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने असे दावे केले आहेत की सर्वांनाच मोठा धक्का बसला. तान्याचा एक्स बॉयफ्रेंड आणि अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आता तिची पोलखोल करत आहेत. याच दरम्यान ग्वाल्हेर एसएसपी कार्यालयात तान्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारीने केली आहे.
फैजान अन्सारीने आरोप केला आहे की, तान्या मित्तलने लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडलाही जेलमध्ये पाठवलं. फैजानने असाही दावा केला आहे की, तान्या मित्तलने बिग बॉस १९ मध्ये तिच्या कुटुंबाबद्दल आणि पर्सनल आयुष्याबद्दल असंख्य वेळा खोटं बोलली आहे. आता त्यांनी तान्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि तिला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
फैजान अन्सारीन ग्वाल्हेरमध्ये येऊन तान्या मित्तलवर अनेक आरोप केले. फैजानने सांगितलं की, तान्याने बिग बॉसच्या घरात तिच्या संपत्तीबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या. जेव्हा तिचे दावे उघड झाले आणि सत्य बाहेर आलं तेव्हा संपूर्ण देशासमोर तिची खिल्ली उडवली गेली. तो आता तान्याविरुद्ध न्यायालयात जाणार आहे. त्याने बलराज सिंग तान्या मित्तलचा बॉयफ्रेंड असल्याचं सांगितलं. तसेच तान्याने त्यालाही फसवलं आहे.
बलराज सिंग यानेच सर्वात आधी एका व्हिडिओद्वारे तान्याचा पर्दाफाश केला होता, ज्यामध्ये त्याने तिच्याबद्दल अनेक गोष्टी उघड केल्या होत्या. बलराजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यामध्ये दावा केला होता की, तान्या त्याला डेट करत होती आणि ती त्याची चाहती होती, परंतु ती खोटी होती. बलराजने म्हटलं होतं की तान्या लोकांचा अनादर करते.
तान्या मित्तल ही ग्वाल्हेरची एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर आहे. तान्याने चंदीगड विद्यापीठातून आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं, परंतु मध्येच ती ग्वाल्हेरला परतली. तान्याने स्पष्ट केलं की तिच्या कुटुंबाने तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर तान्याने गुपचूप कार्ड व्यवसाय सुरू केला. हळूहळू सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आणि ऑनलाईन व्यवसाय सुरू केला.