आधी सत्कार केला अन् मग माइक हिसकावत स्टेजवरुन हाकललं; कॉमेडीयन सुनील पालचा अपमान, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 13:37 IST2026-03-31T12:53:40+5:302026-03-31T13:37:37+5:30

कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकेकाळी सुप्रसिद्ध असलेल्या सुनील पालला आता मात्र अपमान सहन करावा लागत आहे. 

comedian sunil pal gets humiliated in event video gets viral | आधी सत्कार केला अन् मग माइक हिसकावत स्टेजवरुन हाकललं; कॉमेडीयन सुनील पालचा अपमान, व्हिडीओ व्हायरल

आधी सत्कार केला अन् मग माइक हिसकावत स्टेजवरुन हाकललं; कॉमेडीयन सुनील पालचा अपमान, व्हिडीओ व्हायरल

काही मोजक्या कॉमेडियनमध्ये सुनील पाल हे नाव आवर्जुन घेतलं जातं. गेली कित्येक वर्ष सुनील पालने त्याच्या कॉमेडीने प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं. पण, सध्या कॉमेडियन सुनील पालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकेकाळी सुप्रसिद्ध असलेल्या सुनील पालला आता मात्र अपमान सहन करावा लागत आहे. 

मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी सुनील पालला आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्याचा सत्कारही केला गेला. मात्र त्यानंतर त्याला स्टेजवरुन हकलण्यात आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की कार्यक्रमात स्टेजवर बोलवून सुनील पालचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला जात आहे. मात्र त्यानंतर सुनील पाल जेव्हा बोलण्यासाठी माइकजवळ जातो तेव्हा त्याला दूर केलं जातं. एवढंच नव्हे तर त्याच्या हातातून माइकही हिसकावल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. सुनील पाल आभार व्यक्त करायचे आहेत, असंही म्हणत असल्याचं दिसत आहे. मात्र तरीदेखील त्याला बोलण्यासाठी माइक दिला जात नाही. 


पुढे स्टेजवरील व्यक्ती सुनील पालला स्टेजवरुन उतरण्यास सांगत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. अपमान झाल्यानंतर सुनील पाल कार्यक्रमातून निघून गेला. सुनील पालचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Web Title : सम्मान के बाद कॉमेडियन सुनील पाल का अपमान, मंच पर छीना माइक।

Web Summary : मुंबई में एक कार्यक्रम में कॉमेडियन सुनील पाल को आमंत्रित किया गया, सम्मानित किया गया, फिर अचानक माइक छीन लिया गया और मंच छोड़ने के लिए कहा गया, जिससे सार्वजनिक आक्रोश फैल गया।

Web Title : Comedian Sunil Pal humiliated after felicitation, mic snatched on stage.

Web Summary : Comedian Sunil Pal was invited to a Mumbai event, felicitated, then abruptly denied the microphone and asked to leave the stage, causing public outrage.