अंकिता लोखंडे या मालिकेतून करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 18:35 IST2018-09-11T18:33:20+5:302018-09-11T18:35:41+5:30
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून अर्चनाच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. ती कलर्स वाहिनीवरील एका मालिकेत स्पेशल अपियरन्स करणार आहे.

अंकिता लोखंडे या मालिकेतून करणार छोट्या पडद्यावर कमबॅक
छोट्या पडद्यावर गणेश महोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमध्ये गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे. कलर्स वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'शक्ति- अस्तित्व के एहसास की'मध्ये देखील गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मालिकेत गणेशोत्सव साजरी करायची तयारी सुरू असून गणपती स्पेशल ट्रॅकमध्ये पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे स्पेशल गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहे.
'शक्ति- अस्तित्व के एहसास की' मालिकेत अंकिता स्पेशल अपियरन्स करताना दिसणार आहे. या मालिकेत एक ट्रॅक दाखवला जाणार आहे ज्यात अंकिता हॉस्पिटलच्या सांस्कृतिक कार्यक्रमात दिसणार आहे. यात मुख्य भूमिकेत असलेले पात्र सौम्य व हरमनला काही लोक भेटतात. ते त्यांच्या विभागातील गणेशमूर्ती मंडळात नेत असतात. त्यादरम्यान ते तिथे गाणी गातात व नाचतात. बाप्पाच्या आगमनात ते दोघे तल्लीन होऊन जातात. या ट्रॅकमध्ये अंकिता लोखंडे दिसणार आहे.
अंकिताचे चाहते तिला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अंकिता कंगना रानौतचा बहुचर्चित चित्रपट 'मणिकर्णिका'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात ती झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे.