दोन संस्कृतींचा मिलाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 12:56 IST2016-10-03T07:23:34+5:302016-10-03T12:56:40+5:30

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत सोनाक्षी आणि देवचा विवाह प्रेक्षकांना नुकताच पाहायला मिळाला. या मालिकेत देव ...

Combination of two cultures | दोन संस्कृतींचा मिलाप

दोन संस्कृतींचा मिलाप

छ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेत सोनाक्षी आणि देवचा विवाह प्रेक्षकांना नुकताच पाहायला मिळाला. या मालिकेत देव उत्तर भारतीय असल्याचे तर सोनाक्षी बंगाली असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे लग्नात देव उत्तर भारतीय वराच्या वेषात तर सोनाक्षी बंगाली वधूच्या वेशात दाखवली गेली. मालिकेतील या भागाचे चित्रीकरण करायला खूपच मजा आली असे एरिका फर्नांडिस आणि शाहीर शेख यांचे म्हणणे आहे. शाहीर शेख सांगतो, "भारतात लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा मिलाप नसून लग्न दोन संस्कृती, परिवार, चालीरिती यांना एकत्र आणते. या मालिकेत आम्ही दोघे वेगवेगळ्या जातीचे दाखवण्यात आलेलो असल्याने प्रेक्षकांना दोन वेगवेगळ्या संस्कृती या मालिकेत पाहायला मिळाल्या. या भागाचे चित्रीकरण करायला आम्ही खूप उत्सुक होतो. मला आणि एरिकाला आमच्या दोघांचा लुक आणि वेशभूषा खूपच आवडली होती." 

Web Title: Combination of two cultures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.