सोनाक्षीच्या प्रेमात ‘देव’चं कलरफुल्ल जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:02 IST2016-06-03T11:32:52+5:302016-06-03T17:02:52+5:30
देव आणि सोनाक्षीच्या जीवनात नवे रंग भरु लागलेत. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील या ...
.jpg)
सोनाक्षीच्या प्रेमात ‘देव’चं कलरफुल्ल जीवन
द व आणि सोनाक्षीच्या जीवनात नवे रंग भरु लागलेत. 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' या छोट्या पडद्यावरील मालिकेतील या देव आणि सोनाक्षीच्या लव्ह स्टोरीला नवा रंग चढू लागलाय. कारण देव अर्थात शाहिर शेख मालिकेत आलेल्या ट्विस्टमुळे एक्साईटेड झालाय. डॉ. सोनाक्षी (एरिका फर्नांडिस)बाबत देव भावनिकदृष्ट्या आकर्षित होतोय. तिची प्रत्येक गोष्ट त्याला आवडू लागलीय. देवमधील हाच बदल त्याच्या आयुष्यात नव्या गोष्टी घडवणार आहे. या ट्विस्टमुळं मालिकेत तर रंग भरत आहेच मात्र त्याच्या लूकमध्येही नवे रंग भरले जातायत. आधी देवला डार्क आणि डल रंगाच्या कपड्यांमध्ये रसिकांनी पाहिलंय. मात्र सोनाक्षीच्या प्रेमामुळं देवचं आयुष्य आणि कपडेसुद्धा कलरफुल्ल होऊ लागलेत. विविध रंगाच्या कपड्यांमध्ये देव पाहायला मिळणार आहे. यांत सर्वात जास्त रंग दिसणार आहे तो ऑरेंज कारण हा रंग सोनाक्षीचा फेव्हरेट आहे. त्यामुळं देव आणि सोनाक्षीची ही कलरफुल्ल लव्हस्टोरी काय रंग दाखवते हे पाहावं लागेल.