‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर रंगांची उधळण, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 16:35 IST2019-03-18T16:33:19+5:302019-03-18T16:35:05+5:30

शूटिंगच्या निमित्ताने सेटवर कलाकारांनी रंगोत्सव साजरा केलाय.

Color splash on the set of 'Fine 205', see photo | ‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर रंगांची उधळण, पाहा फोटो

‘ललित २०५’ मालिकेच्या सेटवर रंगांची उधळण, पाहा फोटो

आनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी. या खास सणाचं धमाकेदार सेलिब्रेशन  स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आपापसातले हेवेदावे विसरुन संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंब या सणाच्या निमित्ताने एकत्र आलंय. होळीच्या सणासोबतच धुळवड खेळत सर्वांनीच रंगांची उधळणही केलीय. शूटिंगच्या निमित्ताने सेटवर कलाकारांनी रंगोत्सव साजरा केलाय.

या मालिकेत नुकतीच गौरव घाटणेकरचीही एण्ट्री झालीय. त्यामुळे ‘ललित २०५’ कुटुंबासोबतचा त्याचा हा पहिलावहिला सण. या मालिकेत तो आदित्य ही भूमिका साकारतोय. सेटवरच्या या धमाल सेलिब्रेशन बद्दल सांगताना गौरव म्हणाला, ‘बऱ्याच वर्षांनंतर मी रंगोत्सव साजरा केलाय. पूर्वी शाळा-कॉलेजमध्ये असताना मी हा सण खूप एन्जॉय करायचो. ‘ललित २०५’ मालिकेतली ही धुळवड माझ्या कायम लक्षात राहिल. जवळपास १२ तास आम्ही रंगांची उधळण केली. प्रेक्षकांसाठी हा होळी स्पेशल एपिसोड खूपच खास ठरणार आहे. या भागात आदित्यचं एक खास गुपितही उलगडणार आहे. 

भैरवीची भूमिका साकारणारी अमृता पवारही मालिकेतल्या या सेलिब्रेशनविषयी भरभरुन बोलली. ‘होळी स्पेशल भागाचं शूटिंग आम्ही जवळपास ३ दिवस केलं. होळी दहनाच्या शूटिंगदिवशी आम्ही सेटवर सुग्रास जेवणाचा बेतही केला. खास बात म्हणजे या सेलिब्रेशनमध्ये इको फ्रेण्डली रंग वापरले आहेत आणि पाण्याचा वापर कुठेही केला नाही. त्यामुळे प्रेक्षकांनाही मी इको-फ्रेण्डली रंगोत्सव साजरा करण्याचं आवाहन करेन.

Web Title: Color splash on the set of 'Fine 205', see photo

टॅग्स :Lalit 205ललित 205