‘मेरे अंगने मेंं’साठी पूजाने ओढली सिगारेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 17:14 IST2016-06-30T11:44:48+5:302016-06-30T17:14:48+5:30
भूमिकेत जीव ओतरण्यासाठी कलाकार अपार कष्ट घेतात. आता झारखंडच्या बोकारोमधील २५ वर्षीय पूजा शर्माचेच बघा ना. ‘मेरे अंगने मेंं’ ...

‘मेरे अंगने मेंं’साठी पूजाने ओढली सिगारेट
भ मिकेत जीव ओतरण्यासाठी कलाकार अपार कष्ट घेतात. आता झारखंडच्या बोकारोमधील २५ वर्षीय पूजा शर्माचेच बघा ना. ‘मेरे अंगने मेंं’ या मालिकेत पूजाने चंदाची भूमिका साकारली आहे. ही चंदा आता खलनायिका बनली असून धूम्रपान व मद्यपानही करते. ही भूमिका साकारण्यासाठी पूजाने प्रथमच सिगारेट ओढली. पूजा धूम्रपान करीत नाही. पण भूमिकेची गरज म्हणून पूजाने अतिशय सकारात्मकरित्या कॅमेºयासमोर सिगारेट ओढली. यासाठी तिने म्हणे धूम्रपान करणाºया लोकांचे निरीक्षण केले आणि सेटवर चार दिवस सरावही केला. याबद्दल पूजाला विचारले असता तिने आपला मजेशीर अनुभव सांगितला.
![]()
माझी भूमिका जिवंत वाटावी म्हणून मी मुंबईच्या रस्त्यांवर धूम्रपान करणाºया लोकांचे निरीक्षण केले. हे कठीण होते पण दिग्दर्शकांच्या मदतीने मी ते साकारले, असे तिने सांगितले. ‘मेरे अंगने मेंं’च्या ट्रकमध्ये अम्माजींना घरात सिगारेटची पाकिटे सापडतात. त्या रिया किंवा शिवमवर शंका घेतात. पण ती सिगारेटची पाकिटे चंदाची असतात. आता चंदाचे हे खरे रूप अम्माजी व इतर घरच्या सदस्यांसमोर येईल, ते बघणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.