बालपण देगा देवाच्या सेटवर आनंदीने जिंकली सगळ्यांची मने
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 14:32 IST2017-07-12T09:02:42+5:302017-07-12T14:32:42+5:30
लहान मुलांच्या निरागस वागण्याने, बोलण्याने कधी आपल्याला ते लळा लावतील हे सांगता येत नाही. त्यांचा अवतीभवती असलेला वावर, त्यांचे ...
.jpg)
बालपण देगा देवाच्या सेटवर आनंदीने जिंकली सगळ्यांची मने
ल ान मुलांच्या निरागस वागण्याने, बोलण्याने कधी आपल्याला ते लळा लावतील हे सांगता येत नाही. त्यांचा अवतीभवती असलेला वावर, त्यांचे कधी न संपणारे प्रश्न, निरागसता आणि लाघवी बोलणे कधी समोरच्याला त्यांच्या प्रेमात पाडतील हे कळणे कठीणच. त्यांच्या आजूबाजूला असण्याने आणि त्यांच्या निखळ हसण्यानेच मुळी आपण आपली सगळी दु:ख क्षणात विसरून जातो. बालपण देगा देवा या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकरणारी आनंदी म्हणजेच मैथिली पटवर्धन सेटवर सगळ्यांची लाडकी बनली आहे. काही दिवसांमध्येच तिने सगळ्यांना आपलेसे केले आहे. मालिकेप्रमाणेच ती सेटवर देखील सगळ्यांना अनेक प्रश्न विचारते, त्यांच्याशी गप्पा मारते, तिचा सेटवर कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. मालिकेमध्ये असलेल्या मुलांसोबत ती खेळते. तसेच सेटवर ती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास देखील करते. तिच्या अशा वागण्याने संपूर्ण सेटवर खेळीमेळीचे वातावरण असते.
मैथिली ठाण्यामधील सरस्वती विद्यालयामध्ये शिकत असून ती चौथीमध्ये आहे. शाळा आणि मालिकेचे शुटींग या दोन्ही गोष्टींमध्ये ती सध्या समतोल राखत आहे. तिला तिच्या अभ्यासाबद्दल विचारले असता ती सांगते, तिच्याबरोबर तिची आई सेटवर जातीने हजर असते आणि आईच तिचा नियमित अभ्यास घेते.
मिलिंद शिंदे, भाग्यश्री राणे यांचीदेखील आनंदी लाडकी बनली आहे. मालिकेतील नयनतारा म्हणजे भाग्यश्री राणे हिच्यासोबत तर मैथिलीचे खास नाते निर्माण झाले आहे. खेळणे असो वा जेवण जेवणे असो वा झोपणे भाग्यश्रीमावशी शिवाय तिचे पानदेखील हलत नाही. मैथिली अतिशय गोड आणि लाघवी मुलगी आहे असे भाग्यश्रीचे म्हणणे आहे. मालिकेमध्ये अण्णाचा रोल साकारणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले देखील मैथिलीच्या नियमित अभ्यास करण्याचे कौतुक करतात. ती मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा अभ्यास करते. ती खुप हुशार आणि शहाणी मुलगी असल्याचे ते सांगतात. काही दिवसांमध्येच ती आपली लाडकी झाली आहे असे देखील ते आवर्जून सांगतात. सेटवर अगदी आजोबा नातीची जशी काळजी घेतील अशी अण्णा मैथिलीची काळजी घेतात आणि तिला शिस्त देखील लावतात.
Also Read : बालपण देगा देवामध्ये अंधश्रद्धेविरोधात आनंदीचे पहिले पाऊल!