साईशा भोईरला 'लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड'; 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत चिंगीने जिंकली मनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 11:25 IST2023-02-22T18:53:32+5:302023-02-23T11:25:12+5:30
'नवा गडी नवं राज्य' मालिकेतील चिंगी उर्फ साईशा भोईरला 'लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड' पटकावला आहे.

साईशा भोईरला 'लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड'; 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत चिंगीने जिंकली मनं
मुंबईत मोठ्या दिमाखात लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला. बालकलाकार साईशा भोईर ठरली सर्वोत्कृष्ट कॉन्टेंट क्रिएटर. साईशा हा अवॉर्ड आदित्य ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी स्टेजवर कमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा उपस्थित होते. अवॉर्ड स्विकारल्यानंतर चिमुकल्या साईशाने आपल्या आई-वडिलांचे आभार मानले तसेच 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत उपस्थितींची मनं जिंकली.
साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. मे 2021 मध्ये साईशाचे इन्स्टाग्रामवर 10 केवळ फॉलोअर्स होते. आज हा आकडा २ लाख 21 हजारांवर पोहोचला आहे. तिचे स्वत:चे युट्यूब चॅनलही आहे. साईशाच्या इन्स्टा अकाऊंटवर डान्सचे, जेवण बनवतानाचे अनेक व्हिडीओ आहेत.
साईशा भोईर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय बालकलाकार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून साईशाने टीव्ही जगतात पदार्पण केलं. यात मालिकेत तिनं कार्तिकीची भूमिका साकारली होती. सध्या ती झी मराठीवरील 'नवा गडी नवं राज्य' मालिकेत चिंगीची भूमिका साकारते आहे.