शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना! म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 16:47 IST2025-07-12T16:41:05+5:302025-07-12T16:47:16+5:30

शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना! म्हणाला...

chhatrapati shivaji maharaj 12 forts included in unesco list of world heritage marathi actor saourabh chougule share post | शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना! म्हणाला...

शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, मराठी अभिनेत्याने व्यक्त केल्या भावना! म्हणाला...

Marathi Actor Post: छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडताच प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. मुठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महाराजांची गौरवगाथा वर्णावी तेवढी थोडीच आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. दरम्यान, याची घोषणा झाल्यानंतर राजकीय वर्तुळातून तसेच अनेक कलाकार देखील आनंद व्यक्त करत आहेत. याचपार्श्वभूमीवर मराठी मालिकाविश्वातील अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्यानंतर अभिनेता सौरभ चौघुलेने (Saorabh Choughule) सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'जीव माझा गुंतला' मालिकेतून अभिनेता सौरभ चौघुले घराघरात पोहोचला. सौरभ सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो. समाजातील अनेक घडामोडींवरही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. सौरभ चौघुलेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत त्यामध्ये लिहिलंय की, "आता हे जपण्याची, आदर करण्याची जबाबदारी आपली, जय शिवराय, जय महाराष्ट्र!" अभिनेत्याच्या या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

'या' किल्ल्यांचा समावेश 

युनेस्कोने 'अद्वितीय वैश्विक मूल्य' म्हणून ज्या किल्ल्यांचा समावेश केला आहे त्यात रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तमिळनाडूतील जिंजी या  किल्ल्यांचा समावेश आहे.

Web Title: chhatrapati shivaji maharaj 12 forts included in unesco list of world heritage marathi actor saourabh chougule share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.