घटस्फोटानंतरही सतत एकमेकांसोबत दिसणारे Charu Asopa-Rajeev Sen झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले-डेली सोप आहे का यांंचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 16:07 IST2023-06-21T15:47:16+5:302023-06-21T16:07:33+5:30

कायदेशीररित्या घटस्फोट घेतल्यानंतर एकमेकांसोबत सतत दिसणाऱ्या चारू आणि राजीव आता ट्रोल्सच्या निशाण्यावर आले आहेत.

Charu asopa rajeev sen spotted on a coffee date after divorce people trolled them | घटस्फोटानंतरही सतत एकमेकांसोबत दिसणारे Charu Asopa-Rajeev Sen झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले-डेली सोप आहे का यांंचं आयुष्य

घटस्फोटानंतरही सतत एकमेकांसोबत दिसणारे Charu Asopa-Rajeev Sen झाले ट्रोल, नेटकरी म्हणाले-डेली सोप आहे का यांंचं आयुष्य

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची वहिनी चारू असोपा आणि भाऊ राजीव सेन सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहेत. अभिनेत्री चारू असोपा आणि राजीव सेनचा ८ जूनला घटस्फोट झाला असून ते आप-आपल्या आयुष्यात पुढे चालेल आहे. चारू केवळ अभिनेत्री नाही तर व्लॉगर देखील आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. घटस्फोटानंतर चारु आणि राजीव सतत एकत्र दिसतायेत. 

चारू असोपा आणि राजीव सेन मुलगी जियाना सेनसोबत कॉफी डेटवर गेली होती. तिने एक इंस्टाग्राम रील पोस्ट केली आहे ज्यामध्ये तो त्याच्या मुलीसोबत दिसत आहे. जियाना चारूच्या मांडीवर मुलगी जियाना झोपलेली दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये हार्टचा एक इमोजी पोस्ट केला आहे. दुसर्‍या इन्स्टा स्टोरीमध्ये, चारू आणि राजीव कॉफी डेटचा आनंद घेताना दिसत आहेत.

राजीव-चारु झाले ट्रोल
घटस्फोटानंतरही एकमेकांसोबत सतत दिसणाऱ्या चारू आणि राजीव आता ट्रोल्सच्या निशाण्यावर आले आहेत. एका यूजरने लिहिले की, "डेली सोप आहे का यांंचं आयुष्य." तर दुसऱ्याने लिहिले की, "नात्याची खिल्ली उडवली आहे." तर आणखी एकाने लिहिले, "एकतर तुम्ही लोक एकमेकांना मूर्ख बनवत आहात किंवा तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना मूर्ख बनवत आहात किंवा हे प्रसिद्धी स्टंटसाठी आहे .. "

तर राजीवने अलीकडेच त्याच्या एका व्लॉगमध्ये खुलासा केला आहे की त्याने चारूला एक वेब सीरिज ऑफर दिला. केली आहे आणि ती त्याच्यासोबत ती करायला तयार होईल अशी आशा आहे. एका मुलाखतीत राजीव म्हणाला होता की, "आम्ही पुढील महिन्यापासून शूटिंग सुरू करत आहोत. मी चारूला या चित्रपटात एक भूमिका ऑफर केली आहे जी खूप आव्हानात्मक आहे. तसेच चारू आणि मी कधीही स्क्रिन शेअर केली नाही त्यामुळे ती सहमत असेल अशी आशा करूया.

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results


 

Web Title: Charu asopa rajeev sen spotted on a coffee date after divorce people trolled them