घटस्फोटानंतरही लेकीच्या वाढदिवसासाठी एकत्र आले राजीव सेन आणि चारु असोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:44 IST2023-11-02T14:36:25+5:302023-11-02T14:44:38+5:30

चारू असोपाने मुलगी जियानासोबत ट्विविनिंग केलं होतं. पिंक कलरच्या ड्रेसमध्ये आई-मुलीची जोडी खूप सुंदर दिसत होती.

Charu asopa and rajeev sen daughter 2nd birthday bua sushmita sen attendant | घटस्फोटानंतरही लेकीच्या वाढदिवसासाठी एकत्र आले राजीव सेन आणि चारु असोपा

घटस्फोटानंतरही लेकीच्या वाढदिवसासाठी एकत्र आले राजीव सेन आणि चारु असोपा

टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती राजीव सेन वेगळे झाले आहेत पण ते अनेकदा त्यांची मुलगी जियानाच्या निमित्तानं एकत्र येतात. मुलीच्या दुसर्‍या वाढदिवसा निमित्त दोघे एकत्र आले होते. 1 नोव्हेंबर रोजी, जियाना दोन वर्षांची झाली आणि तिच्या आई-बाबांनी एकत्र येऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन केलं. पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुलीच्या आनंदासाठी दोघे मतभेद विसरुन एकत्र आलेत. 

चारू असोपाने मुलगी जियानासोबत ट्विविनिंग केलं होतं. पिंक कलरच्या ड्रेसमध्ये आई-मुलीची जोडी खूप सुंदर दिसत होती. जियाने वडील राजीव आणि आई चारूसोबत केक कापला. वाढदिवसानिमित्त संपूर्ण खोली गुलाबी रंगाच्या फुग्यांनी सजवली होती. राजीवने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये सुष्मिता सेनही जोरात बोलताना दिसत आहे.जियाना खूप आनंदी दिसत आहे.

चारू आणि राजीवबद्दल बोलायचे झाले तर दोघांचा घटस्फोट झाला आहे. दोघांचेही जून २०१९ मध्ये लग्न झाले होते. गोव्यात त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग होते. चारू आणि राजीव यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, लग्नानंतर लगेचच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. चारू आणि राजीव यांनी हे नातं वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. पण यात त्यांना यश आलं नाही. या वर्षी चारू आणि राजीव यांचा घटस्फोट झाला. दोघांनी एकमेकांवर अनेक गंभीर आरोपही केले होते.. घटस्फोटानंतर दोघेही आपल्या मुलीचे संगोपन करत आहेत. दोघेही अनेकदा एकत्र दिसत आहेत.

Web Title: Charu asopa and rajeev sen daughter 2nd birthday bua sushmita sen attendant