या पंजाबी अभिनेत्याबरोबर रोमान्स करीत आहे चंद्रमुखी चौटाला ऊर्फ कविता कौशिक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 19:40 IST2017-12-05T14:09:10+5:302017-12-05T19:40:01+5:30

‘एफआयआर’ या मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारणारी कविता कौशिक सध्या एका पंजाबी अभिनेता तथा गायकाबरोबर रोमान्स करताना दिसत आहे. वाचा सविस्तर!

Chandramukhi Chautala alias poetry Kaushik is romancing with this Punjabi actor. | या पंजाबी अभिनेत्याबरोबर रोमान्स करीत आहे चंद्रमुखी चौटाला ऊर्फ कविता कौशिक!!

या पंजाबी अभिनेत्याबरोबर रोमान्स करीत आहे चंद्रमुखी चौटाला ऊर्फ कविता कौशिक!!

य, हे खरं आहे. परंतु रिअल लाइफमध्ये नव्हे तर रील लाइफमध्ये आहे. टीव्ही अभिनेत्री कविता कौशिक ऊर्फ चंद्रमुखी चौटाला सध्या पंजाबी चित्रपटांमध्ये काम करीत आहे. तिला पंजाबी गायक तथा अभिनेता गुरुदास मान याचा चित्रपट मिळाला आहे. या अगोदरही कविताने एक पंजाबी चित्रपट केला आहे. कॉमेडी मालिका एफआयआरमध्ये दबंग पोलीस अधिकाºयाची भूमिका साकारणारी कविता सध्या या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे नाव ‘ननकाना’ असे ठेवण्यात आले असून, कविताने या चित्रपटाविषयी इन्स्टाग्रामवर लिहिले की, ‘अनोख्या प्रेमाची अनोखी कथा’. या चित्रपटाला गुरदास मानची पत्नी मंजित मान दिग्दर्शित करीत आहे. हा चित्रपट वैशाखीच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच १३ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. 
 

कविता कौशिकने एकता कपूरच्या ‘कुटुंब’ या मालिकेतून करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिला खरी ओळख ‘एफआयआर’ या कॉमेडी मालिकेतून मिळाली. मालिकेतील तिची चंद्रमुखी चौटाला ही भूमिका खूपच पसंत केली गेली. विशेष म्हणजे पुढे तिला कविता कौशिक या नावाने नव्हे, तर चंद्रमुखी चौटाला या नावानेच ओळखले जाऊ लागले. या मालिकेमुळे कविताला खºया अर्थाने स्टारडम मिळाले. या व्यतिरिक्त कविता ‘नच बलिए’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्येदेखील आपला जलवा दाखविताना दिसली. 
 

तसेच वेळोवेळी तिने तिच्या डान्सचे जलवेही दाखविले. त्याचबरोबर आता अशीही बातमी येत आहे की, टीव्हीची ही दबंग पोलीस अधिकारी ‘सावधान इंडिया’ हा शो होस्ट करताना दिसणार आहे. थोडक्यात ती पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपला दमदार अंदाज दाखविण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या ती गुरदास यांच्यासोबत एका मोठ्या पंजाबी चित्रपटात काम करीत असून, दोघांचा रोमान्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

Web Title: Chandramukhi Chautala alias poetry Kaushik is romancing with this Punjabi actor.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.