Chandrakanta: मालिकेसाठी कृतिका कामरा आणि गौरव खन्नानंतर सुदेश बेरीचीही निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 17:42 IST2017-02-03T12:02:51+5:302017-02-03T17:42:15+5:30

'देवों के देव- महादेव' या आपल्या भव्य मालिकेनंतर निखिल सिन्हा यांनी ‘चंद्रकांता’ या मालिकेची निर्मिती केली आहे. येत्या मार्च ...

Chandrakanta: Selector Kadra and Gaurav Khanna after the selection of Sudesh Barry | Chandrakanta: मालिकेसाठी कृतिका कामरा आणि गौरव खन्नानंतर सुदेश बेरीचीही निवड

Chandrakanta: मालिकेसाठी कृतिका कामरा आणि गौरव खन्नानंतर सुदेश बेरीचीही निवड

'
;देवों के देव- महादेव' या आपल्या भव्य मालिकेनंतर निखिल सिन्हा यांनी ‘चंद्रकांता’ या मालिकेची निर्मिती केली आहे. येत्या मार्च महिन्यात चंद्रकांताचे प्रसारण करण्यात येईल असे मालिकेच्या टीमने सांगितले आहे. एकेकाळी दुरदर्शनवर हिट ठरलेली मालिका आता दोन चॅनल्सवर प्रसारित होणारी 'चंद्रकांता' मालिकेशी निगडीत रोज नवनवीन गोष्टी उघड होत असल्यामुळे आता ही मालिका रसिकांच्या भेटीला कधी येणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. या मालिकेत कृतिका कामरा आणि गौरव खन्ना यांच्यानंतर अभिनेता सुदेश बेरीचेही मालिकेसाठी निवड करण्यात आले आहे. या मालिकेत सुदेश ‘मारिचा’ची भूमिका साकारणार आहे.अनेक नामवंत अभिनेत्यांच्या सहभागामुळे ‘लाईफ ओके’वरील ‘चंद्रकांता’ ही आगामी कल्पनारम्य मालिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे. ही नकारात्मक भूमिका असून सुदेश हा मालिकेतील प्रमुख खलनायक असणार आहे.

या भूमिकेसंदर्भात सुदेशकडे विचारणा केली असता तो म्हणाला, “ही भूमिका माझ्याकडे आली, तेव्हा माझ्या अंत:प्रेरणेने मला ही भूमिका स्वीकारण्यास सांगितले. माझ्या दृष्टीने पैशांना दुय्यम महत्त्व आहे; कारण मी एक अभिनेता आहे आणि मी या क्षेत्रात अभिनय करण्यासाठी आलो आहे. शेवटी प्रेक्षक तुम्हाला तुमच्या भूमिकेवरूनच अोळखतात, म्हणूनच मी ही भूमिका स्वीकारली.”या मालिकेत गौरव खन्ना राजा वीरेन्द्र ही भूमिका साकारणार आहे.राजा वीरेन हा आपल्या आयुष्यात रोज नवनव्या आव्हानांचा शोध घेत असतो.लहानपणापासूनच त्याला नवनव्या आव्हानांचा मुकाबला करण्यास शिकवले जाते.जो कोणी आपल्या या ध्येयाच्या आड येईल, त्याचा शेवट करण्याचे शिक्षण राजा वीरेन्द्रला दिलेले असते. सर्वजण त्याला घाबरून असतात.त्याचा देवावर आणि प्रेमावर विश्वास नसतो.अशा प्रकारची राजा वीरेन्द्रही भूमिका असणार आहे.

Web Title: Chandrakanta: Selector Kadra and Gaurav Khanna after the selection of Sudesh Barry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.