चॅलेंज! पिंक रंगाच्या फ्रॉकमधील या गोंडस मुलीला ओळखलंत का?; छोट्या पडद्यावर गाजवतेय अधिराज्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:00 IST2022-02-07T14:00:00+5:302022-02-07T14:00:00+5:30
मराठी टेलिव्हिजनवरील टॉपच्या मालिकेतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

चॅलेंज! पिंक रंगाच्या फ्रॉकमधील या गोंडस मुलीला ओळखलंत का?; छोट्या पडद्यावर गाजवतेय अधिराज्य
कलाकार म्हटलं तर चर्चा ही होणारच..! मग ते त्यांचे ग्लॅमरस फोटो असोत किंवा आगामी प्रोजेक्ट...बऱ्याचदा कलाकार त्यांचे जुने फोटो शेअर करतात.. तर कधी जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. कधी कधी बालपणींचे फोटो शेअर करून शुभेच्छा देतानाही दिसतात. दरम्यान आता आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने तिच्या बालपणीचा फोटो शेअर करून तिच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा तिच्या बालपणीचा फोटो आहे. या फोटोत ती पिंक रंगाच्या फ्रॉकमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्यासोबत तिची बहिण अमृता असून तिचा हात पकडून मधुराणी केक कापताना दिसत आहे. या क्युट फोटोला चाहत्यांची पसंती मिळत आहेत. या फोटोवर प्रचंड लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
मधुराणी प्रभुलकर हिला आई कुठे काय करते या मालिकेतून लोकप्रियता मिळाली. तिने मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. तिने या मालिकेपूर्वी 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही काम केले आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे.