विलासराव देशमुख यांच्यासोबत असलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? मराठी इंडस्ट्रीत आहे दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 12:54 IST2023-11-05T12:54:02+5:302023-11-05T12:54:37+5:30
Marathi actor: तुम्ही ओळखू शकता का या अभिनेत्याला?

विलासराव देशमुख यांच्यासोबत असलेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का? मराठी इंडस्ट्रीत आहे दबदबा
सध्याच्या काळात सोशल मीडिया प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे आज सेलिब्रिटी याच माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. यात खासकरुन अनेक कलाकार त्यांच्या जुन्या आठवणी सुद्धा नेटकऱ्यांसोबत शेअर करतात. सध्या सोशल मीडियावर एका लोकप्रिय अभिनेत्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा अभिनेता विलासराव देशमुख यांच्या शेजारी उभा असून त्याने या फोटोमागील किस्सा शेअर केला आहे. विशेष म्हणजे सध्या हा अभिनेता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मात्र, त्याचा हा फोटो पाहून अनेक जण त्याला ओळखू शकलेले नाहीत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो लोकप्रिय अभिनेता, सूत्रसंचालक निलेश साबळे याचा आहे. 'हसताय ना हसायलाच पाहिजे' असं म्हणत घराघरात पोहोचलेला निलेश साबळे सध्या चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. काही काळापूर्वीच निलेशने सोशल मीडियावर एन्ट्री केली असून अल्पावधीत त्याचा चाहतावर्ग तुफान वाढला आहे. त्यामुळे या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी तो कायम प्रयत्न करत असतो.
निलेशने अलिकडेच इन्स्टाग्रामवर विलासराव देशमुख यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. सोबतच या फोटोमागील किस्साही त्याने सांगितला आहे. "मेडिकल कॉलेजला शिकत असताना .. interuniversity competition इंद्रधनुष्य या स्पर्धेचा विजेता झालो .. त्या वेळचे माननीय मुख्यमंत्री ‘विलासरावजी देशमुख’ यांच्या हस्ते बक्षिस स्वीकारण्याचा अभिमानास्पद क्षण .. आणि पाठीवर ठेवलेले शाबासकीचे हात .. खूप काही करण्याची प्रेरणा देऊन गेले..", असं कॅप्शन देत निलेशने हा फोटो शेअर केला.